सलमान खानला शस्त्र परवानाला सामाजिक संस्थेचा विरोध

शस्त्र परवाना न देण्यासाठी संघर्ष नावाच्या संघटनेने मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांना पत्र
Social organizations letter to police commissioner against grant of arms license to Salman Khan
Social organizations letter to police commissioner against grant of arms license to Salman Khan

मुंबई - सुपरस्टार सलमान खानला शस्त्र परवाना न देण्यासाठी संघर्ष नावाच्या संघटनेने मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर याना पत्र लिहिले आहे. या पत्रात सलमानचा यापूर्वी हिट अँड रन प्रकरणापासून ते पत्रकाराशी झालेल्या गैरवर्तनाच्या घटनेपर्यंत गुन्हेगारी रेकॉर्ड असल्याचे सांगत शस्त्र परवाना देऊ नये, अशी विनंती करण्यात आली आहे. सलमान आणि त्यांच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची सांगण्याची धमकी देणारे पत्र मिळाल्यानंतर सलमानने मुंबई पोलिसांकडे शस्त्र परवान्यासाठी अर्ज केला आहे.

नुकतेच बॉलिवूड अभिनेता सलमान खानने मुंबई पोलिस आयुक्तांची भेट घेतली. सलमान खान आणि त्याचे वडील सलीम खान यांना धमक्या मिळाल्यानंतर ही भेट झाली. परवानाधारक शस्त्रासाठी सलमान खानने अर्ज केला आहे. मुंबईतील ‘संघर्ष’ या सामाजिक संस्थेने याला विरोध केला. संघटनेचे अध्यक्ष पृथ्वीराज म्हशके यांनी सांगितले की, सलमान खानवर अनेक खटले असून तो आक्रमक मनाचा आहे, अशा स्थितीत त्यांना परवाना देणे योग्य नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com