
डोंबिवली : कल्याण ग्रामीणमधील कासा रिओ आणि कासा गोल्ड को. ऑप. हाउसिंग सोसायटीची निवडणूक प्रक्रिया रविवारी पार पडली. या निवडणूक प्रक्रियेवर सोसायटी मेंबर आणि रहिवाशांनी आक्षेप घेतला आहे. निवडणूक प्रक्रियेत कोणत्याही प्रकारचे नियम पाळले गेलेले नाहीत. याप्रकरणी आम्ही न्यायालयात जाणार आहोत असे सोसायटी मेंबर यांनी यावेळी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना सांगितले.