esakal | BMC : सफाई कामगारांच्या वसाहतींच्या पुनर्विकासाला स्थायी समितीची मंजुरी
sakal

बोलून बातमी शोधा

BMC

BMC : सफाई कामगारांच्या वसाहतींच्या पुनर्विकासाला स्थायी समितीची मंजुरी

sakal_logo
By
समीर सुर्वे

मुंबई : पूर्व उपनगरातील सहा ठिकाणच्या सफाई कामगारांच्या (cleaning worker) वसाहतींच्या पुनर्विकासाला (society redevelopment) महानगर पालिकेच्या स्थायी समितीने (sthayi samiti) परवानगी दिली आहे. महानगरपालिका यासाठी 415 कोटी रुपयांचा खर्च करणार आहे.

हेही वाचा: राज्यातील वरिष्ठ महाविद्यालये दिवाळीनंतर होणार सुरू

पालिकेचे कायमस्वरुपी 29 हजार 618 सफाई कामगार असून त्यातील 5 हजार 592 सफाई कामगार हे पालिकेच्या वसाहतीत राहातात.या वसाहती 60च्या दशकातील असून त्या जिर्ण झाल्याच आहेत त्याच बरोबर घरेही 150 चौरस फुटांचे आहेत. त्यामुळे या वसाहतींचा आश्रय योजने अंतर्गत पुनर्विकास करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे.

त्यासाठी मुंबई शहर विभागातील वसाहतींच्या पुनर्विकासाला मंजूरी मिळाली होतीच त्याच बरोबर आता पुर्व उपनगरातील वसाहतीच्या पुनर्विकासाठीही परवानगी मिळाली आहे. देवनार,चेंबूर,कुर्ला,घाटकोपर,भांडूप,मुलूंड येथील या वसाहती आहेत.पुनर्विकासात सफाई कामगारांना 300 चौरस फुटांची घरे मिळणार आहेत.असे सांगण्यात आले.

loading image
go to top