
मुंबई : यूएईमधून आल्यावर नियमानुसार संस्थात्मक क्वारंटाईन न होता घरी गेल्यामुळे अभिनेता, सिने निर्माता सोहेल खान, अरबाज खान आणि त्याचा पुत्र निर्वाण खान या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तिघांची रवानगी हॉटेलमध्ये अथवा पालिकेच्या विलगीकरण केंद्रात केली जाणार आहे. या तिघांना तुरुंगवास किंवा दंड अशी कारवाई होऊ शकते.
हे तिघे 25 डिसेंबरला यूएईमधून मुंबईत आले. कोव्हिड नियमावलीनुसार आखाती देशातून आलेल्या व्यक्तीला सात दिवस संस्थात्मक विलगीकरणात राहावे लागते. त्यानुसार या तिघांनी वांद्रे येथील ताज लॅन्ड ऍन्ड या हॉटेलमध्ये राहाणार असल्याचे सांगितले. त्यानंतर पालिकेच्या नियंत्रण कक्षातून आज हॉटेल व्यवस्थापनाशी संपर्क साधून या तिघांबद्दल माहिती घेण्यात आली. तेव्हा त्यांनी 26 डिसेंबरला बुकिंग रद्द केल्याचे हॉटेल व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले. या प्रकाराची गंभीर दखल घेऊन पालिकेच्या एच पश्चिम प्रभाग कार्यालयामार्फत खार पोलिस ठाण्यात या तिघांविरोधात साथरोग नियंत्रण कायदा 1897, आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 तसेच भारतीय दंडसंहितेनुसार गुन्हा नोंदविण्यासाठी पत्र दिले. त्यानुसार पोलिसांनी तत्काळ कारवाई केली आहे.
या तिघांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना यामुळे कोव्हिडचा धोका निर्माण झाल्याची शक्यता आहे. तसेच त्यांच्यामुळे इतरांच्या जीवालाही धोका निर्माण झाला आहे, असे पालिकेने पाठवलेल्या पत्रात नमूद केले आहे. तिघांनाही आता संस्थात्मक विलगीकरणात पाठवले जाण्याची शक्यता आहे. त्यांच्यावर फौजदारी कारवाईही होऊ शकते.
Sohail, Arbaaz Khan along with the boy charged Action for violating covid rules
--------------------------------------------------
( संपादन - तुषार सोनवणे )
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.