

solapur accident
ESakal
डोंबिवली : डोंबिवली पश्चिमेतील उमेशनगर भागातील भाविकांच्या वाहनाला सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा परिसरात भीषण अपघातात झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी घडली आहे. या दुर्घटनेत ठाणे जिल्ह्यातील चार भाविकांचा मृत्यू झाला आहे. यात डोंबिवलीमधील दोन भाविकांचा समावेश आहे. या दुर्घटनेची माहिती मिळताच डोंबिवली पश्चिम परिसरात शोककळा पसरली आहे.