सुशांतसिंग आत्महत्या प्रकरण! सारा, रकुल, सिमोन यांना समन्स पाठवणार; अंमली पदार्थ विरोधी पथकाने फास आवळला

अनिश पाटील
Monday, 21 September 2020

सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणी तपास करणा-या केंद्रीय अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या (एसीबी) तपासात सारा अली खान, रकुल प्रीत, सिमोन खांबाटा या बॉलीवूडमधील प्रसिद्ध व्यक्तींची नावे समोर आली होती.

मुंबई : सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणी तपास करणा-या केंद्रीय अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या (एसीबी) तपासात सारा अली खान, रकुल प्रीत, सिमोन खांबाटा या बॉलीवूडमधील प्रसिद्ध व्यक्तींची नावे समोर आली होती. आता त्यांना या आठवड्यात समन्स पाठवण्यात येणार आहेत, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.

महाविद्यालयीन कर्मचाऱ्यांना रेल्वे प्रवासाची मुभा द्यावी; शिवसेना आमदाराचीच मुख्यमंत्र्यांकडे मागणी

रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शौविक हे सॅम्युअल मिरांडा तसेच दीपेश सावंतच्या माध्यमातून अमली पदार्थ तस्करांच्या संपर्कात होते. त्यानुसार, एनसीबीने मुंबई आणि गोवा येथे छापे टाकले होते. आतापर्यंत याप्रकरणी 21  जणांना अटक केली आहे. एनसीबीच्या चौकशीत रियाने सारा, रकुल,  सिमोन खंबाटा यांची नावे पुढे आली होती. त्यांच्यापैकी कोणालाही अद्याप समन्स पाठवण्यात आले नाही. परंतु या आठवड्यात पाठवण्यात येणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.

ऑक्सिजन पुरवठादारांच्या नफेखोरीवर राज्य सरकारचे नियंत्रण नाही; 'आयएमए'चा आरोप

रियाने केवळ गांजा आणि एमडी हे अमली पदाथ सुशांतला दिले नाही तर कोकेनसारखे हाय प्रोफाईल अमली पदार्थ देखील वापरल्याचे आत्तापर्यंतच्या तपासात समोर आले आहे.  याप्रकरणी अनेक बॉलिवूड सेलिब्रेटींना  समन्स पाठविण्यात येणार आहे. तर काही तस्कराना अटक होण्याची शक्यता असल्याचे एनसीबीने स्पष्ट केले.

-----------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sushant Singh case Summons to Sarah Rakul Simon The anti narcotics squad was caught