esakal | मुंबई महापालिकेतील 'भाईगिरी' संपणार ?
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबई महापालिकेतील भाईगिरी संपणार ?

मुंबई महापालिकेतील भाईगिरी संपणार ?

sakal_logo
By
समीर सुर्वे -सकाळ वृत्तसेवा

मुंबई: मुंबई महानगर पालिकेतून (bmc) विधानपरीषदेवर (Mlc) निवडून जाणाऱ्या दोन जागांसाठी डिसेंबर महिन्यात निवडणुक होणार आहे. या निवडणुकीत सध्याच्या संख्याबळानुसार काँग्रेसचा उमेदवार निवडून येणे अवघड आहे. त्यामुळे मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप (congress bhai jagtap) यांचे विधानसभा सदस्य पद धोक्यात आले आहे. तर,शिवसेनेचे भाई म्हणजे माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम (shivsena ramdas kadam) यांनाही पुन्हा उमेदवारी मिळण्याची शक्यता कमी असल्याने पालिकेतील भाई गिरी संपणार का? अशी चर्चा आता सुरु झाली आहे. (Congress bhai jagtap & shivsena ramdas kadam possibly couldnt get chance at mlc from bmc dmp82)

मुंबई महानगर पालिकेतून शिवसेनेचे रामदास कदम आणि भाई जगताप हे दोघे निवडून गेले आहेत. नगरसेवकांच्या सदस्य संख्येवरुन हे सदस्य निवडले जातात यात 77 नगरसेवकांनी पहिल्या पसंतीचे मत दिल्यावर सदस्याचा थेट विजय होतो. काँग्रेसचे संख्याबळ 29असून कितीही प्रयत्न केला तरी काँग्रेसला स्वत:चा सदस्य निवडून आणणे अवघड आहे.

हेही वाचा: मुंबईत उद्यानाला टिपू सुलतानचे नाव देण्याचा वाद, हिंदुत्ववादी संघटना आक्रमक

त्यामुळे मुंबई अध्यक्षांचीच विधीमंडळातील खुर्ची धोक्यात आली आहे. काँग्रेसला आपला सदस्य निवडून आणायचा असल्याने 48 नगरसेवक फोडावे लागणार आहेत. सध्याच्या परीस्थीतीत एकवढ्या मोठ्या प्रमाणात नगरसेवक फोडणे शक्य नाही. त्यामुळे कॉंग्रेसचा उमेदवार निवडून येणे अवघड आहे.

हेही वाचा: नाहीतर ही जनता ह्या सरकारचा अंत केल्या शिवाय राहणार नाही - मनसे

भाई जगताप यांच्या बरोबरच रामदास कदम सलग दोन वेळा मुंबई महानगर पालिकेतून निवडून गेले आहेत. मात्र,गेल्या विधानसभा निवडणुकी पासून शिवसेनेने कदम यांना बाजूला केले असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे कदम यांना सलग तीसऱ्यांना उमेदवारी मिळणे अवघड आहे.

भाजपचे संख्याबळ वाढणार

मुंबई महानगर पालिकेतून विधानपरीषदेवर भाजपचा उमेदवार सहज निवडून जाऊ शकतो. भाजपचे 83 नगरसेवकांचे संख्याबळ आहे.त्यामुळे त्यांचा विजय हमखास असून त्यामुळे विधानपरीषदेतील संख्याबळही वाढणार आहे.

शिवसेनेची टिम युवा

शिवसेनेकडे 97 नगरसेवकांचे संख्याबळ आहे.त्यामुळे त्यांचा उमेदवार निवडूनच येणार. विधानपरीषदेसाठी कोणाला उमेदवारी द्यावी हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.मात्र,यावेळी शिवसेनेकडून पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या विश्‍वासू साथीदारीला प्रतिनिधीत्व मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. टिम युवा मधून सदस्यत्व मिळाले नाही तर मातोश्रीवर रोजची उठबस असलेल्या व्यक्तीला प्रतिनिधीत्व मिळेल असे समजते.

loading image