Mumbai Crime News : धक्कादायक! डोक्यात 'जाते' घालत मुलाने केली बापाची हत्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

son killed father family dispute alcoholic crime police mumbai

Mumbai Crime News : धक्कादायक! डोक्यात 'जाते' घालत मुलाने केली बापाची हत्या

डोंबिवली - वडिलांना पूर्वी असलेले दारूचे व्यसन, त्यातून होणारी त्यांची चिडचिड आणि घरातील भांडण याला वैतागून एका 21 वर्षे मुलाने डोक्यात जाते घालत वडिलांचे हत्या केल्याची खळबळ जनक घटना डोंबिवली मध्ये घडली आहे. बापाची हत्या केल्यानंतर मुलगा स्वतःच रामनगर पोलीस ठाण्यामध्ये हजर झाला आणि आपण वडिलांचा खुन केल्याचे त्याने पोलिसांना सांगितले.

श्यामसुंदर शिंदे (वय 68) असे मृत व्यक्तीचे नाव असून तेजस शिंदे (वय 21) असे हत्या केलेल्या मुलाचे नाव आहे. टिळकनगर पोलिसांनी तेजस याला ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय आफळे यांनी दिली.

डोंबिवली पूर्वेतील खंमबाळपाडा येथील शंकर मंदिराजवळ असलेल्या चाळीत बुधवारी सायंकाळी ही घटना घडली आहे. शिंदे कुटुंब गेल्या 10 वर्षांपासून या परिसरात रहात आहे. श्यामसुंदर हे बीएमसी मध्ये कामाला होते.

ते सध्या रिटायर झाल्याने घरी असत. त्यांची पत्नी ही घरकाम करून परिवाराचा उदरनिर्वाह करत होती. तर मुलगा तेजस हा डोंबिवली मधील एका महाविद्यालयात 14 वी ला शिकत होता. श्यामसुंदर यांना पूर्वी दारूचे व्यसन होते.

सध्या त्यांनी दारू सोडली होती. मात्र त्यामुळे होणारी चिडचिड यामुळे त्यांचे घरी भांडण, मारामारी होत असे. बुधवारी दुपारी तेजस व श्यामसुंदर हे दोघेच घरी होते. यावेळी त्यांच्यात वाद झाला. वाद झाल्यानंतर वडील झोपी गेले पण तेजस याचा राग शांत झाला नव्हता.

या रागाच्या भरात त्याने घरातील जाते वडिलांच्या डोक्यात घातले. एवढेच नाही तर भाजी कापण्याच्या सुरीने वडिलांचा गळा कापला. हत्या केल्यानंतर तो स्वतः रामनगर पोलीस ठाण्यात हजर झाला आणि आपण वडिलांनी मारले असल्याचे पोलिसांना सांगितले.

टिळकनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली असल्याने वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय आफळे यांना त्याची माहिती देण्यात आली. डोंबिवली चे सहाय्यक पोळीस आयुक्त सुनील कुराडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक आफळे,

सह्यायक पोलीस निरीक्षक पांडुरंग पीठे, वैभव चुंबळे, पोलीस उपनिरीक्षक अजिंक्य धोंडे, पोलीस अंमलदार संजय फड, रवींद्र बांगल यांच्या पथकाने तपास सुरू केला. श्यामसुंदर यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुक्मिणी बाई रुग्णालयात हलविण्यात आला आहे. तेजस याला टिळकनगर पोलिसांनी ताब्यात घेतले असून गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक आफळे यांनी दिली.