esakal | हृदयद्रावक! पैसे दिले नाही म्हणून मुलाने केली आईची निर्घृण हत्या
sakal

बोलून बातमी शोधा

crime

हृदयद्रावक! पैसे दिले नाही म्हणून मुलाने केली आईची निर्घृण हत्या

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कळवा : मुंब्रा रेतीबंदर (Mumbra) येथे आईने रिक्षात जाण्यासाठी भाड्याचे पैसे दिले (Auto rent) नाहीत म्हणून जन्मदात्या आईशी भांडण करून आईची (Mother) निर्घृणपणे हत्या केल्याची घटना सोमवार (ता 19)ला दुपारी घडली. मुंब्रा रेतीबंदर येथील मंदाडे चाळीत मयत उर्मिला अरुण अलझेंडे (48) या आपला मुलगा विष्णु व विशाल यांच्यासह एकत्र राहत होत्या. ( Son killed murder Because of not getting auto rent by mother-nss91)

हेही वाचा: Offline Exam: पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेची तारीख ठरली

सोमवार(ता 19)ला दुपारी त्यांचा छोटा मुलगा विशाल याने उर्मिला यांच्या कडून बाहेर फिरायला जाण्यासाठी रिक्षाच्या भाड्यासाठी पैसे मागितले परंतु विशालला काही दिवसांपासून दारूचे व्यसन जडले होते तो दारू पिण्यासाठी कुठे जाऊ नये म्हणून त्याची आई निर्मला अलझेंडे यांनी त्याला भाड्याचे पैसे देण्यासाठी नकार दिला.या कारणांवरून निर्मला व विशाल यांचे भांडण झाले या भांडनात विशालने रागाच्या भरात घरातील भिंतीला अडकवलेले मोठ्या आकाराचे टोकदार 'स्क्रूड्राइव्हर'काढून आईच्या गळ्यावर व छातीवर त्याचे वार करून त्यांची निर्घृणपणे हत्या केली. मुंब्रा पोलिसांनी पारसिक रेतीबंदर परिसरातुन शोध घेत विशाल अरुण अलझेंडे(24)याला सोमवारी रात्री अटक केली.या संदर्भात मुंब्रा पोलिस ठाण्याचे गुन्हे पो.निरीक्षक आर .एस .शेवाळे अधिक तपास करीत आहेत.

loading image