esakal | नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांची रवानगी 14 दिवस न्यायालयीन कोठडीत
sakal

बोलून बातमी शोधा

नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांची रवानगी 14 दिवस न्यायालयीन कोठडीत

मागील महिन्यात समीर खान यांची पूर्ण दिवसभर चौकशी केली गेलेली त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली.

नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांची रवानगी 14 दिवस न्यायालयीन कोठडीत

sakal_logo
By
सुमित बागुल

मुंबई : महाराष्ट्रातील मंत्रिमंडळातील मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांचे जावई समीर खान याना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. ड्रग्स प्रकरणात समीर खान यांची चैकशी सुरु आहे. या पार्श्वभूमीवर समीर खान यांची रवानगी आता न्यायालयीन कोठडीत केली गेली आहे.   

मागील महिन्यात समीर खान यांची पूर्ण दिवसभर चौकशी केली गेली होती. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली आहे. वांद्रे पश्चिमेकडील एका कुरिअरमधून आलेला तब्बल २०० किलो गांजा पोलिसांकडून जप्त करण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी अटक केली होती. 

महत्त्वाची बातमी : जगात येताच त्यांना थेट विकलं जायचं; नवजात मुलीसाठी 60 हजार, मुलासाठी 1.5 लाख, मुंबईत रॅकेटचा पर्दाफाश!

आज समीर खान यांची वैद्यकीय चाचणी करण्यात आली त्यानंतर त्यांना कोर्टासमोर हजर करण्यात आलं. त्यानंतर कोर्टाने समीर खान याना १४ दिवसांच्या पोलिस कोठडीत पाठवलं आहे. 

14 जानेवारी रोजी केलेल्या ट्विटमध्ये नवाब मलिक म्हणाले होत की, "कोणीही कायद्यापेक्षा वरचढ नाही आणि कोणत्याही भेदभावाशिवाय तो लागू केला गेला पाहिजे. कायदा योग्य मार्गाने जाईल आणि न्याय मिळू शकेल. मला न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे. मला न्यायव्यवस्थेचा आदर आहे."

son in law of minister nawab mali sent to judicial custody for next 14 days