सोनिया गांधी यांचे थेट उद्धव ठाकरेंना पत्र; किमान समान कार्यक्रमातील मुद्द्याची करून दिली आठवण

विनोद राऊत
Friday, 18 December 2020

  • एससी, एसटीविकासासाठी सोनिया गांधी यांच्या सरकारला सुचना
  • शासकीय नोकऱ्यातील अनुशेष भरुन काढण्याच्या सोनिया गांधीच्या सुचना 

मुंबई . काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी यांनी एससी, एसटी घटकांच्या सर्वांगिण विकासासाठी राज्य सरकारला सुचना केल्या आहेत. 14 डिसेंबर रोजी सोनिया गांधी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहीले आहे. या पत्रात मागासवर्गीय तरुणांमध्ये उद्योजक घडवण्यासाठी शासकीय कंत्राटे, प्रकल्पात आरक्षण देणे, शासकीय नोकऱ्यामधील अनुशेष भरुन काढण्यासाठी कालबध्द कार्यक्रम राबविण्याच्या प्रमुख सुचना केल्या आहेत.

मुंबई परिसरातील बातम्या वाचण्यासाठी येथे ्क्लिक करा

सोनिया गांधी यांनी महाविकास आघाडी सरकारने एससी, एसटी घटकांच्या विकासासाठी विवीध कार्यक्रम हाती घेण्याच्या सुचना केल्या आहेत .आघाडी सरकारच्या किमान समान कार्यकमातही सरकारने हे आश्वासन दिलं होत. याची आठवणही सोनिया गांधी यांनी या पत्रात करुन दिली आहे.राज्य सरकारने  लोकसंख्येच्या प्रमाणात अनुसुचित जाती, जमातीच्या घटकासांठी निधीचे वाटप करावे, मागासवर्गीयातून उद्योजक घडवण्यासाठी शासकीय कंत्राटे, विकास प्रकल्पात त्यांना आरक्षण देण्यात यावे. यापुर्वी युपीये सरकार आणि  कर्नाटकमध्ये काँग्रेस सरकार असतांना हा निर्णय घेतला होता याचा उल्लेखही सोनिया गांधी यांनी करुन दिला आहे. 

उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडी सरकार किमान समान कार्यक्रमातील महत्वाचे  निर्णय अंमलात आणतील  असा मला ठाम विश्वास आहे असही सोनिया गांधी यांनी या पत्रात म्हटले आहे. 

 

राज्यातीत ग्रामीण भागांतील स्त्रियांमध्ये अशक्तपणाचे प्रमाण जास्त

सोनिया गांधींच्या यांच्या  सूचना एससी, एसटी समाजाच्या विकासासाठी महत्वाच्या आहेत. भाजप सरकारच्या काळात अनुसुचीत जाती, जमातीच्या विकासाचा  मोठा अनुशेष निर्माण झाला आहे, या पार्श्वभूमीवर सरकारचा एक घटक  म्हणून त्यांच्या सुचनांची अंमलबजावणी होईल  असा मला ठाम विश्वास आहे. 
नितीन राऊत, उर्जा मंत्री   

 

सोनिया गांधीच्या पत्रातील ठळक मुद्दे 

1. लोकसंख्येच्या प्रमाणात अनुसुचित जाती, जमातीच्या घटकासांठी निधीचे वाटप 

2. अनुसुचित जाती, जमाती व मागासवर्ग  घटकातील युवकांना  शासकीय कंत्राटे, प्रकल्प व उद्योगधंद्यामध्ये आरक्षण द्यावे      

3. शासकीय नोकऱ्यामधील अनुशेष भरण्यासाठी कालबध्द कार्यक्रम राबवावा 

4.शिक्षण, तंत्रशिक्षण आणि कौशल्य विकास कार्यक्रमात अनुसुचित जाती, जमातीच्या युवकांना प्रशिक्षीत करावे, त्यासाठी शिष्यवृत्ती योजना, वसतीगृह आणि निवासी शाळा यांचे जाळे  विस्तारावे

Sonia Gandhis direct letter to Uddhav Thackeray make the same program point

-----------------------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sonia Gandhis direct letter to Uddhav Thackeray make the same program point