शुद्ध आणि स्वच्छ हवेसाठी रेल्वे स्थानकावर सुरू होणार 'ऑक्सिजन पार्लर'! वाचा सविस्तर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शुद्ध आणि स्वच्छ हवेसाठी रेल्वे स्थानकावर सुरू होणार 'ऑक्सिजन पार्लर'! वाचा सविस्तर

आता रेल्वे स्थानकावर मुंबईकरांना स्वच्छ हवा मिळण्यासाठी मध्य रेल्वे प्रयत्नशील आहे. त्यासाठी रेल्वे स्थानकात ऑक्सिजन पार्लर सुरु करण्यात येणार आहेत.  

शुद्ध आणि स्वच्छ हवेसाठी रेल्वे स्थानकावर सुरू होणार 'ऑक्सिजन पार्लर'! वाचा सविस्तर

मुंबई ः कोरोना महामारीमुळे अमलात आलेल्या लॉकडाऊनचा अनेकांना फटका बसला, पण त्यामुळे प्रदूषण कमी होण्यास मदत झाली. आता रेल्वे स्थानकावर मुंबईकरांना स्वच्छ हवा मिळण्यासाठी मध्य रेल्वे प्रयत्नशील आहे. त्यासाठी रेल्वे स्थानकात ऑक्सिजन पार्लर सुरु करण्यात येणार आहेत.   

मोठी बातमी : राममंदिर भूमिपूजन कार्यक्रमावर शिवसेना आणि राष्ट्रवादीत जुंपली, बड्या नेत्यांमध्ये खडाजंगी

स्थानकांवर 250 चौरस फूट जागेत ही ऑक्सिजन पार्लर असतील. नासाने मान्य केलेली झाडे त्या ठिकाणी असतील. ते त्या ठिकाणी जाऊन स्वच्छ हवा घेऊ शकतील. तसेच त्यांना आवडली तर त्यापैकी काही झाडे विकतही घेऊ शकतील. 

कोरोना लॉकडाऊनमुळे मुंबईच्या हवेतील प्रदूषण खूपच कमी झाले. आता अनलॉकला सुरुवात झाली आहे, त्यावेळीही आपल्याला स्वच्छ हवा मिळण्याची गरज आहे. स्वच्छ हवा घेतल्यास रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण वाढते, त्यामुळे विचार स्वच्छ होतात, हार्ट रेट कमी होण्यास मदत होते. सध्याच्या महामारीच्या कालावधीत याची खूपच गरज आहे असे रेल्वेच्या आधिकाऱ्यांनी सांगितले. 

'खोलसापाडा' धरणाला लवकरच मुहूर्त; वसई-विरारकरांची पाण्यासाठीची वणवण थांबवणार

ऑक्सिजन पार्लर अडीचशे चौरस फूट भागात असतील ती पाच वर्षात सुरु होऊ शकतील. त्या ठिकाणी नासाची मान्यता असलेले आणि घरात ठेवता येतील अशी झाडे असतील. त्याचे दरपत्रकही सोबत असेल. हा प्रकल्प नाशिकला सुरु झाला असल्याचे रेल्वे आधिकाऱ्यांनी सांगितले.

-----------------------------------------------------------

संपादन - तुषार सोनवणे