
विरार : वसई तालुका हा पुरातन संस्कृतीचा आणि धार्मिक संस्कृतीचा भाग राहिला आहे. याठिकाणी जशा भगवान परशुरामाच्या पाऊलखुणा आढळतात तशाच भगवान गौतम बुध्दाच्याही पाऊलखुणा आढळतात. पुरातन काळी सोपारा हे शहर अपरांतांची राजधानी होतो. याच ठिकाणातील नाग राजांनी व लोकांनी भगवान गौतम बुध्दांच्या उपदेशावरून या शहराचा विकास घडवून आणला होता. बुध्द, धम्म व संघ हे बौध्द धम्मांतील तीन रत्ने होत. ही तीन रत्नॅच मानंवात समानता आणू शकतील. सोपारा हे सुध्दा या तीन रत्नांशी बौध्द संस्कृतीमुळे कित्येक वर्षापासून निगडीत आहे.श्रावस्तीला भगवान बुध्दाचे शिष्यत्व पत्करून पुर्णाने सोपारा येथे पहिला बुध्द विहार बांधला कालातरांने हा बुध्द विहार आज विकासा पासून कोसोदूर असल्याचे निदर्शनास येत आहे.