LIC IPO एचएनआयला पाच लाखांच्या बिड्ससाठी 'पेटीएम मनी'ची विशेष व्यवस्था | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Special arrangement Paytm Money 5 lakh to LIC IPO HNI

LIC IPO एचएनआयला पाच लाखांच्या बिड्ससाठी 'पेटीएम मनी'ची विशेष व्यवस्था

मुंबई : एलआयसी च्या आगामी बहुचर्चित आयपीओ साठी एचएनआय अर्थात उच्च उत्पन्न गटातील (हाय नेटवर्थ इंडिव्हिज्युअल) गुंतवणूकदारांना पाच लाखांपर्यंतची बोली यूपीआय मधून करण्यास पेटीएम मनी तर्फे विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.डिस्काउंट ब्रोकर गटातून दिली जाणारी अशा प्रकारची देशातील ही पहिलीच सेवा असल्याचे सांगण्यात येत आहे. पेटीएम मनी चे सीईओ वरूण श्रीधर यांनी येथे ही माहिती दिली. त्याचबरोबर नव्या गुंतवणूकदारांना आपली गुंतवणूक सुरू करता यावी यासाठी आयुष्यभरासाठी विनामूल्य डिमॅट खाते उघडण्याची सुविधाही एटीएमने दिली आहे.

१९७ कम्युनिकेशन लि. चा पेटीएम हा ब्रँड असून त्यांच्यातर्फे डिजिटल पेमेंट आणि वित्तसेवा हाताळल्या जातात. आता त्यांच्यातर्फे एचएनआय गटातील गुंतवणूकदारांसाठी पाच लाखांच्या बोली युपीआय मार्फत लावण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. सेबीच्या पाच एप्रिल रोजी च्या परिपत्रकानुसार एचएनआय गटातील गुंतवणुकदार पाच लाखांपर्यंत बोली लावू शकतील. मात्र त्या बोली यूपीआय पद्धत वापरूनच करावयाच्या आहेत. यापूर्वी ही मर्यादा दोन लाख रुपये होती, मात्र आता एक मे नंतर येणाऱ्या सर्व आयपीओसाठी ती वाढवण्यात आली आहे. या नव्या व्यवस्थेमुळे गुंतवणूकदारांना अत्यंत सोप्या पद्धतीने गुंतवणूक करता येईल असेही वरूण श्रीधर म्हणाले.

  • एलआयसीच्या आयपीओ मध्ये गुंतवणूक करण्याची पद्धती

  • पेटीएम मनीच्या होम स्क्रीन वरील आयपीओ सिलेक्शन मध्ये जा

  • तुम्ही कोणत्या गटातील गुंतवणूकदार आहात तो प्रकार निवडा

  • तुम्ही एलआयसी चे पॉलिसीधारक असाल तर तो गट निवडा

  • त्यासाठी तुमचे पॅन कार्ड एलआयसी पॉलिसी बरोबर जोडले असले पाहिजे

आयपीओ मधील करंट अँड अपकमिंग टॅब मध्ये एल आय सी - आय पी ओ चा पर्याय असेल. तिथे क्लिक केल्यावर अप्लाय नाऊ बटणावर क्लिक केल्यावर तुम्हाला बोली लावण्याच्या पानावर नेले जाईल. तेथे तुम्ही तुमची इच्छित किंमत आणि तुम्हाला किती शेअर हवे आहेत ते नोंदवू शकता. ऐड यूपीआय डिटेल्स सेक्शन मध्ये जाऊन आपला यूपीआय आयडी भरून अप्लाय बटणावर क्लिक करा नंतर ठरलेल्या तारखेला आपल्याला शेअर्स अलॉट झाले की त्याची सूचना गुंतवणूकदारांना दिली जाईल.