Special arrangements in Mumbai Temple
ESakal
मुंबई
Mumbai News: नववर्षाची सुरुवात देवदर्शनानं, मुंबईतील 'सिद्धिविनायक'सह अनेक मंदिरांत भाविकांसाठी विशेष सोय
Siddhivinayak Temple: नवीन वर्षाच्या स्वागतासाठी मुंबईतील सर्व मंदिरे सज्ज झाली आहेत. भाविकांसाठी विशेष सोय करण्यात आले आहे.
मुंबई : नवीन वर्षाच्या स्वागतासाठी मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरासह सर्वच प्रमुख मंदिरे पूर्णपणे सज्ज झाली आहेत. भाविकांच्या प्रचंड गर्दीला सामोरे जाण्यासाठी सिद्धिविनायक मंदिर पहाटे ३.१५ वाजल्यापासून दर्शनासाठी मंदिर खुले करण्यात येणार आहे. तसेच, रेल्वे स्थानकावरून मंदिरात येण्यासाठी मोफत बससेवा आणि सुरक्षेसाठी कडक व्यवस्था करण्यात आली आहे, जेणेकरून भाविकांना सुलभ दर्शन मिळेल.

