मुंबईतील लोकलसेवा सुरु झाल्यास गर्दी टाळण्यासाठी 'हा' पॅटर्न वापरला जाण्याची शक्यता...

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 13 June 2020

मुंबईत गोष्टी जर पुन्हा आधीसारख्या करायच्या असतील मुंबईतील लोकल सेवा सुरु करण्यावाचून पर्याय नाही.

मुंबई : मुंबईकरांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येतेय. देशात अनलॉक १ सुरु आहे. राज्यात मिशन बिगिन अगेन सुरु आहे. अशात मुंबईत गोष्टी जर पुन्हा आधीसारख्या करायच्या असतील मुंबईतील लोकल सेवा सुरु करण्यावाचून पर्याय नाही. मात्र कोरोनाचं संकट अजूनही गेलेलं नाही. अशा परिस्थितीत मुंबईची लाईफ लाईन कशी सुरु करता येईल याबाबत विचारविनिमय सुरु आहे.     

गेल्या काही दिवसात सातत्याने मुंबईतील लोकल रेल्वे सेवा सुरु करण्यात यावी अशी राज्याकडून केंद्राकडे मागणी करण्यात येतेय. सध्या मुंबईत अत्यावश्यक सेवा आणि सरकारी कार्यालयांमध्ये जाणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी काही विशेष लोकल सुरु आहेत. दरम्यान आता याच पार्श्वभूमीवर अभ्यास करून मुंबईतील मध्य आणि पश्चिम रेल्वेची लोकल सेवा सुरु करण्याबाबत विचार सुरु असल्याचं समजतंय. एका नामांकित इंग्रजी माध्यमाने याबाबत माहिती दिलीये.       

BIG NEWS - निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर 'का' आहेत खासदार सुनील तटकरे नाराज ? असं काय घडलं की...

२०२० च्या मार्च महिन्यापासून मुंबईची लाईफ लाईन, मुंबई लोकल बंद आहे. सध्या सोडण्यात येणाऱ्या विशेष लोकलमधून प्रवास करणाऱ्यांना विशेष पास देण्यात आलाय. याच पासच्या धर्तीवर ते ये जा करू शकतात. अशाच काही बाबींचा अभ्यास करून पुन्हा लोकल सेवा सुरू करण्याबाबत विचार केला जात आहे

श्रमिक ट्रेनसाठी वापरण्यात आलेला पॅटर्न मुंबईतील लोकल ट्रेनसाठी सुरु करण्यात येऊ शकतो. मध्य आणि पश्चिम रेल्वेकडून तसा अभ्यास सुरु असल्याची बातमी एका इंग्रजी माध्यमाने दिली आहे. यामध्ये जे अत्यावश्यक सेवेतील आणि सरकारी कर्मचारी लोकलमधून प्रवास करणार आहेत त्यांच्या नावांची यादी रेल्वेकडे देण्यात येणार असल्याची माहिती मिळतेय. या यादीतील कर्मचाऱ्यांना विशेष पास देण्यात येतील. दरम्यान ज्यांच्याकडे हा पास असेल त्यांनाच ट्रेनने प्रवास करता येऊ शकेल असंही समजतंय. 

special pass system might be implemented if mumbai suburban local trains starts


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: special pass system might be implemented if mumbai suburban local trains starts