विशेष बातमी : कोरोना लसीकरणाच्या ड्रायरनमध्ये काय आल्यात अडचणी? कोणकोणत्या समस्या उद्भवू शकतात ?

विशेष बातमी : कोरोना लसीकरणाच्या ड्रायरनमध्ये काय आल्यात अडचणी? कोणकोणत्या समस्या उद्भवू शकतात ?

मुंबई, 06 : राज्यात कोरोना लसीकरणाच्या रंगीम तालिमेची जोरदार सुरवात झाली. मात्र, सॉफ्टवेअरवर अवलंबून असणारे हे पहिले लसीकरण, त्याला लागून येणाऱ्या कनेक्टिव्हिटीच्या समस्या, घाईत उभारलेली शीत साखळी आणि इतर यंत्रणा त्यात आरोग्य कर्मचाऱ्यांची अनुत्सुक्ता, असे गंभीर अडथळे ड्राय रनच्या ट्रॅकवर उद्भवण्यास सुरुवात झाली. मात्र, तरीही सरकारी यंत्रणा आणि वैद्यकीय तज्ज्ञ लसीकरणाबाबत सकारात्मक असून मुख्य लसीकरणाची चाचपणी करणार आहेत. यात मुख्य लसीकरणापूर्वी या मोहिमेची पूर्वतयारी आणि जागरूकता यांच्या आभ्यासात कोणतेही कच्चे दुवे न सुटता सुसूत्रता असावी तरच ही मोहीम यशस्वी होऊ शकते असे तज्ज्ञ सांगतात.

संपूर्ण सॉफ्टवेअर अवलंबून असलेली ही लसीकरणाची मोहीम असल्यामुळे महाराष्ट्राच्या काही आदिवासी जिल्ह्यांमधील कमकुवत इंटरनेट कनेक्टिव्हिटीमुळे आव्हान निर्माण होईल अशी चिंता वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. अधिकाऱ्यांच्या मते मॉक ड्रिल केवळ चांगल्या इंटरनेट कनेक्टिव्हिटी असलेल्या केंद्रांवर घेण्यात आलं आहे. जालना, नंदुरबार, नागपूर आणि पुणे येथे ड्राय रन घेण्यात आलं आहेत. अनेक दुर्गम भागातून मोबाईलचे शून्य इंटरनेट आणि कनेक्टिव्हिटीची तक्रार समोर येत आहे. महाराष्ट्रातील बहुतेक नेटवर्कबाबतच्या समस्या नंदुरबार, पालघर, गडचिरोली, चंद्रपूर आणि अमरावती आणि नाशिकच्या काही भागांत उद्धभवल्या आहेत.

सॉफ्टवेअरद्वारे लस लाभार्थींना लसीचे प्रमाणपत्र देण्यासाठी मोबाइल अप्लिकेशन डिजीलॉकरशी देखील जोडले गेले आहे. या ऍपद्वारा लसीकरणाची दिनांक आणि जागा लाभार्थ्यास SMS द्वारे पाठवण्यासाठी 12 भाषांमध्ये सोय करण्यात आली आहे. त्यात दुसर्‍या डोस बाबतची माहिती ही दिली जाईल.

प्रत्येक जिल्ह्याने आरोग्य कर्मचाऱ्याचा डेटा को-विन सॉफ्टवेअरवर अपलोड केला आहे. महाराष्ट्रभरातील 7.58 लाख आरोग्य कर्मचार्‍यांचा डेटा त्यात आहे. एकदा आरोग्य कर्मचारी लसीकरणासाठी आला की सॉफ्टवेअरमध्ये त्याचे किंवा तिचे नाव दिसेल. कोणती लस दिली गेली आणि त्याचे काय परिणाम झाले का, याची माहिती ही त्यात दिली जाईल. लसीकरणानंतर लसीकरण प्रमाणपत्र तयार केले जाईल.

दरम्यान, 8 जानेवारी रोजी सर्व 36 जिल्ह्यांत संभाव्य अडचणी जाणून घेण्यासाठी आणखी एक ड्राय रन घेण्यात येणार आहे. त्यामध्ये दिसून येणारे अडथळे जाणून त्यावर उपाय शोधणे गरजेचे आहे.

केंद्राकडून मार्गदर्शन आवश्यक -

8 जानेवारीला संपूर्ण राज्यभर पुन्हा एकदा जिल्हास्तरीय ड्राय रन करण्याचे आदेश दिले आहेत. त्यातून जे काही प्राथमिक अडथळे निघतील त्यावर राज्यपातळीवर चर्चा होऊन काय उपाययोजना केली पाहिजे याचा विचार झाला पाहिजे. इंटरनेटसह अनेक अडथळे समोर येणार आहेत. केंद्रानेही यात मार्गदर्शन करणे महत्त्वाचे आहे. पहिल्या टप्प्यातील ज्या काही सुविधा लागणार आहेत, त्या सर्व आताच्या घडीला उपलब्ध आहेत. लसीकरणाबाबत कोणतीही साशंकता न ठेवता  कर्मचाऱ्यांना योग्य मार्गदर्शन करुन किंवा कोरोना इतर व्याधींनी ग्रस्त आहेत त्यांना त्याची योग्य माहिती देऊन त्याबाबत सकारात्मक विचार केला पाहिजे. शिवाय, ही लस आवश्यक, सुरक्षित आणि परिणामकारक आहे असे महाराष्ट्र सरकारचे कोविड -19 चे तांत्रिक सल्लागार डॉ. सुभाष साळुंखे यांनी सांगितले आहे.

पूर्णपणे लसीकरण सॉफ्टवेअरवर अवलंबून -

लसीकरणासाठी इंटरनेट ही सर्वात मोठी चिंतेची बाब आहे आणि केंद्र सरकारकडून या प्रश्नांची सोडवणूक अद्याप बाकी नाही. पूर्वी, गोवर आणि रुबेला लसीकरण मनुष्यबळाचा वापर करुन केले गेले. मात्र ही पहिलीच वेळ आहे जेव्हा सर्वच जण पूर्णपणे लसीकरणासाठी सॉफ्टवेअरवर अवलंबून आहेत,” असे ही साळुंखे  यांनी स्पष्ट केले आहे.

आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये साशंकता -

दरम्यान, लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्यांना लस दिली जाणार आहे. त्यामुळे, या लसीकरणाबाबत आरोग्य कर्मचाऱ्यांसह लोकांमध्येही साशंकता आणि भीती आहे. मात्र, ब्रिटनमध्ये झालेल्या लसीकरणात कोणालाही त्रास झालेला नाही. लसीकरण हे ऐच्छिक आहे. जबरदस्ती करुन लसीकरण करता येणे शक्य नाही. पण, लोकांनी ही लस घ्यावी. या लसीच्या ट्रायल कमी झाल्या आहेत. हा एक दोष सोडल्यास बाकी लसीच्या परिणामकारतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होण्याचे काही कारण नाही. लसीकरण नियोजित प्रकारे करणे गरजेचे असून सरकार त्यासाठी प्रयत्नशील असल्याचे इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष अविनाश भोंडवे यांनी सांगितले आहे. 

special report on dark spots and loopholes observed during dry run in maharashtra

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com