दादर ते सावंतवाडी रोड दरम्यान विशेष ट्रेन! मध्य रेल्वेची घोषणा; कोकणवासीयांना दिलासा

दादर ते सावंतवाडी रोड दरम्यान विशेष ट्रेन! मध्य रेल्वेची घोषणा; कोकणवासीयांना दिलासा


मुंबई - मध्य रेल्वे दादर ते सावंतवाडी रोड दरम्यान विशेष ट्रेन चालविणार आहे. या विशेष गाड्या  पूर्णपणे आरक्षित असतील. मान्सून, नॉन-मॉन्सूनच्या वेळेसाठी ही मध्य रेल्वेने सोया केली आहे. त्यामुळे कोकणवासीयांना दिलासा मिळणार आहे.

विशेष ट्रेन मध्ये एक द्वितीय श्रेणी एसी, चार तृतीय श्रेणी एसी, 8 स्लीपर क्लास, 6 द्वितीय श्रेणी सिटींग राखीव डबे राहणार आहे. तर 01003/01004 विशेष गाड्यांचे बुकिंग 24 सप्टेंबर पासून सर्व आरक्षण केंद्रांवर व www.irctc.co.in वेबसाइटवर सुरू करण्यात येणार आहे. केवळ आरक्षित तिकिट असलेल्या प्रवाश्यांनाच या विशेष गाड्यांमध्ये प्रवासाची परवानगी देण्यात येईल, दरम्यान प्रवाशांनी  बोर्डिंग, प्रवास आणि गंतव्यस्थानाच्या वेळी कोविड - 19 शी संबंधित सर्व निकषांचे पालन करावे लागणार आहे.

मान्सूनच्या वेळा

दादर-सावंतवाडी रोड विशेष ट्रेन
01003 विशेष गाडी दादरहून दररोज रात्री 12.5 मिनिटाने 26 सप्टेंबर ते 31 ऑक्टोबर पर्यंत सुटेल आणि सावंतवाडी रोडला त्याच दिवशी दुपारी 12.20 वाजता पोहोचेल.

01004 विशेष गाडी सावंतवाडी रोड येथून दररोज दुपारी 5.30 वाजता 26 सप्टेंबर ते 31 ऑक्टोबर दरम्यान सुटेल आणि दुसर्‍या दिवशी दादरला सकाळी 6.45 वाजता पोहोचेल.
 
थांबे : ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण , सावर्डा, अरावली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडावली, विलावडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ.
 
मुंबई पालिकेच्या रुग्णालयांना पावसाचा फटका; नायर, कस्तुरबा, जे.जे. रुग्णालयात पाणीच पाणी, ओपीडीमध्ये रुग्णांचे हाल 

नॉन-मॉन्सूनच्या वेळा

दादर-सावंतवाडी रोड विशेष ट्रेन
01003 विशेष गाडी दादरहून दररोज रात्री 12.5 वाजता 1 नोव्हेंबर पासून ते पुढील सूचना मिळेपर्यंत सुटेल आणि सावंतवाडी रोडला त्याच दिवशी सकाळी 10.40 वाजता पोहोचेल.
01004 विशेष गाडी सावंतवाडी रोड येथून दररोज सायंकाळी 6.50 वाजता 1 नोव्हेंबर पासून ते पुढील सूचना मिळेपर्यंत सुटेल आणि दुसर्‍या दिवशी दादरला सकाळी 6.45 वाजता पोहोचेल. 

थांबे: ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण , सावर्डा , अरावली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडावली, विलावडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ.

----------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com