परप्रांतीयासाठी दिलासादायक बातमी, लवकरच मुंबईतून सुटू शकते विशेष ट्रेन!

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 7 May 2020

सध्या देशभरात तिसऱ्या टप्प्यातील लॉकडाऊन सुरु आहे. लॉकडाऊन जाहिर झाल्यापासून देशभरातले मजूर, कामगार वेगवेगळ्या राज्यात अडकले गेले.

मुंबई  सध्या देशभरात तिसऱ्या टप्प्यातील लॉकडाऊन सुरु आहे. लॉकडाऊन जाहिर झाल्यापासून देशभरातले मजूर, कामगार वेगवेगळ्या राज्यात अडकले गेले. त्यानंतर तिसऱ्या लॉकडाऊनच्या काळात या मजूरांना कामगारांना आपआपल्या राज्यात परत पाठवण्याची तयारी गेली आणि त्यानुसार त्यांच्यासाठी विशेष ट्रेन सोडण्यात आल्या. महाराष्ट्रातून पहिली ट्रेनही भिवंडी आणि नाशिकहून सोडण्यात आली. त्यानंतर आता मजुरांना त्यांच्या राज्यात पोहोचविण्यासाठी लवकरच मुंबईतूनही रेल्वेगाड्या सुरू करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे. बुधवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला. विश्वसनीय सूत्रांनी याबाबतची माहिती दिली आहे. त्यामुळे आता मुंबईतूनही विशेष ट्रेन सोडली जाऊ शकते.  

मुंबईत अडकलेले मजूर आणि कामगार हे प्रामुख्यानं उत्तर प्रदेश आणि बिहारचे आहेत. आतापर्यंत महाराष्ट्रातून आणि मुंबईतल्या जवळच्या रेल्वे स्थानकावरुन आधीच रेल्वेगाड्या रवाना झाल्या आहेत. मात्र अद्याप प्रत्यक्षात मुंबईतल्या कुठल्याही रेल्वे स्थानकावरुन मजुरांना नेणारी गाडी सोडण्यात आलेली नाही. या मजुरांबाबत उत्तर प्रदेश सरकारशी राज्य सरकारनं चर्चा देखील केली. त्यावेळी काही अटी असल्यामुळे काही समस्या निर्माण झाल्या होत्या. मात्र आता ते प्रश्न मिटले असून मुंबईतून रेल्वेगाड्यांनी परप्रांतीयांना नेण्यात येईल, असं सांगण्यात येत आहे.

लालपरी निघाली ! आजपासून एसटीची मोफत सेवा; वाचा कुणाला आणि कुठे प्रवास करता येणार...

याबाबत राज्य सरकारनं रेल्वे प्रशासनासी चर्चा केली असून अधिकच्या रेल्वे गाड्यांची मागणी केली आहे. दरम्यान राज्याला जेवढ्या रेल्वेगाड्यांची गरज आहे त्याच्या तुलनेत खूप कमी गाड्या दिल्या जात आहे. त्याबद्दल बैठकीत नाराजी देखील व्यक्त केली गेली. 

हजारो मजूर- कामगार स्वगृही 

पहिल्यांदा नाशिक येथून उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशच्या दिशेनं मोठ्या संख्येने रेल्वेनं मजुर रवाना झाले. त्यानंतर भिवंडी स्थानकातूनही एक हजारहून अधिक मजुरांना घेऊन रेल्वे गोरखपूर दिशेने रवाना झाली. 2 मे रोजी मध्य रात्री 1 वाजता भिवंडी रेल्वे स्थानकातून गोरखपूरकडे ही ट्रेन रवाना झाली. त्यामध्ये 1104 मजूर होते. तर शनिवारी रात्री उशिरा चार वाजता वसई रोड रेल्वे स्थानकातून गोरखपूरच्या दिशेनं पहिली विशेष ट्रेन सोडण्यात आली. 22 डब्यांच्या या विशेष गाडीत एकूण 1200 प्रवासी होते. या प्रवासासाठी 740 रुपये तिकिट आकारण्यात आलं आहे.

पांढऱ्या कफन ऐवजी त्यांच्या नशिबी प्लॅस्टिकच... 'ते' भोगतायत मरणानंतरच्या मरणयातना; सायन रुग्णालय मधील विदारक वास्तव समोर....

मंगळवारपर्यंत राज्यातून 15 आणि बुधवारी रात्री 10 अशा 25 रेल्वेगाड्या आतापर्यंत कामगारांना घेऊन इतर राज्यात गेल्या असल्याची माहिती प्रधान सचिव डॉ नितीन करीर यांनी मंत्रिमंडळ बैठकीत दिली. चंद्रपूर आणि गडचिरोली येथे बाहेरील राज्यातून मजुरांना घेऊन मंगळवारपर्यंत 2 रेल्वे आल्या अशी माहिती बैठकीत देण्यात आली.

special train for migrant worker might run from mumbai read full news


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: special train for migrant worker might run from mumbai read full news