esakal | भिवंडीत भरधाव बसची हातगाडीला धडक; विचित्र दुर्घटनेत केळीविक्रेता जखमी
sakal

बोलून बातमी शोधा

भिवंडीत भरधाव बसची हातगाडीला धडक; विचित्र दुर्घटनेत केळीविक्रेता जखमी

भिवंडी शहरातील वंजारपट्टी नाका जवळ नो एन्ट्रीमधून जाणाऱ्या फळविक्रेत्याला बसने जोरदार धडक दिल्याने फळविक्रेता जखमी झाला आहे.

भिवंडीत भरधाव बसची हातगाडीला धडक; विचित्र दुर्घटनेत केळीविक्रेता जखमी

sakal_logo
By
शरद भसाळे

भिवंडी - भिवंडी शहरातील वंजार पट्टी नाका बागे फिरदोस मशिदीजवळ उड्डाणपूल शेजारी रस्त्यावर प्रवेश बंद असताना नो एन्ट्री मधून हात गाडी घेऊन जाणाऱ्या हातगाडीस भरधाव एका बसचा मागील भागाची धडक बसल्याने झालेल्या विचित्र दुर्घटनेत हातगाडी विक्रेता चालक जखमी झाला आहे. या दुर्घटने संदर्भात कोणत्याही प्रकारची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल झालेली नाही सदर हात गाडी चालक झालेल्या अपघात दुर्घटनेत जखमी झाला आहे.हा अपघात सीसीटीव्ही कॅमेरे मध्ये कैद झाला आहे. 

मुंबई परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा

भिवंडी शहरातील विविध भागात महापालिकेचा रस्त्याची काम अत्यंत संथगतीने सुरू आहेत. त्यामुळे वाहतुकीचे योग्य पद्धतीने नियोजन नसल्याने तसेच इंट्री व नो एंट्री फलक नसल्याने वाहन चालक तसेच फेरीवाले,हातगाडी चालक वाटेल तिथे रस्त्यावर गाड्या उभ्या करून वाहतूक कोंडी करत असतात,भिवंडी महापालिका प्रशासन याबाबत कोणतीही ठोस कारवाई करत नसल्यामुळे या हातगाडी चालक व फेरीवाल्यांमुळे विविध ठिकाणी रस्त्यावर नेहमी वाहतूक कोंडी होत असते.तीन दिवसापूर्वी भिवंडी शहरातील वंजार पट्टी नाका मशिद फिरदोस मशिद रोड येथील स्व.राजीव गांधी उड्डाणपूल शेजारी रस्त्यावरून प्रवेशबंद असताना एक केळी फळ विक्रेता आपले हातगाडी घेऊन या मार्गावरून जात असताना समोरून येणाऱ्या एका भरधाव टी.एम.टी (  ठाणे मनपा ) बस चा मागील भागाची या हातगाडीला जोरात धडक लागल्याने झालेल्या अपघातात तो हात गाडी चालक सुद्धा गाडीसह उडाला व या अपघातात किरकोळ जखमी झाला आहे.याबाबत कोणतीही नोंद नाही.

speed bus hits handcart in Bhiwandi Banana seller injured in accident

------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )