esakal | संचारबंदीतही कोपर पुलाच्या कामाला वेग! 
sakal

बोलून बातमी शोधा

लॉकडाऊनमुळे रेल्वेसेवा बंद असल्याने पत्री पुलापाठोपाठ कोपर पुलाचेही काम हाती घेण्यात आले आहे. शुक्रवारपासून या कामास सुरुवात झाली असून पंधरा दिवसांच्या कालावधीत पुलाचा जुना ढाचा पाडण्यात येणार आहे. याच कालावधीत वीज वाहिन्या भूमिगत करण्याचे कामही महावितरणक

लॉकडाऊनमुळे रेल्वेसेवा बंद असल्याने या काळात डोंबिवलीतील कोपर पुलाचे काम प्रशानाच्या वतीने हाती घेण्यात आले आहे. कोपर पुलाचा जुना ढाचा पाडण्यात येणार आहे. महावितरणनेही डोंबिवली पश्चिमेला वीजपुरवठा करणाऱ्या वाहिन्या रेल्वे मार्गाखालून टाकण्याचे काम हाती घेतले आहे. या कामास सुरुवात झाली असून सध्या खड्डा खोदण्याचे काम सुरू आहे. भूमिगत वायर नव्याने टाकण्यात येणार असून पुलावरील वाहिन्या प्रत्यक्षात पूल पाडण्याच्या वेळी हटविण्यात येतील, असे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

संचारबंदीतही कोपर पुलाच्या कामाला वेग! 

sakal_logo
By
शर्मिला वाळुंज

ठाणे : लॉकडाऊनमुळे रेल्वेसेवा बंद असल्याने या काळात डोंबिवलीतील कोपर पुलाचे काम प्रशानाच्या वतीने हाती घेण्यात आले आहे. कोपर पुलाचा जुना ढाचा पाडण्यात येणार आहे. महावितरणनेही डोंबिवली पश्चिमेला वीजपुरवठा करणाऱ्या वाहिन्या रेल्वे मार्गाखालून टाकण्याचे काम हाती घेतले आहे. या कामास सुरुवात झाली असून सध्या खड्डा खोदण्याचे काम सुरू आहे. भूमिगत वायर नव्याने टाकण्यात येणार असून पुलावरील वाहिन्या प्रत्यक्षात पूल पाडण्याच्या वेळी हटविण्यात येतील, असे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. 

वाचा सविस्तर : एकीकडे कोरोना, दुसरीकडे अपघात सत्र, पोलिसही वैतागले

डोंबिवली पूर्व-पश्चिमेला जोडणारा कोपर पूल धोकादायक झाल्याने ऑगस्ट महिन्यात पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली. जुना पूल पाडून या ठिकाणी महापालिका प्रशासनाच्यावतीने नवीन पुलाची उभारणी करण्यात येणार आहे. यापूर्वी पुलावरील भार कमी करून पूल वाहतुकीसाठी वापरता येऊ शकतो का, या विषयीची पहाणी पालिका प्रशासन, रेल्वेकडून सुरू होती.

रेल्वेने महावितरणला पत्रव्यवहार करुन पुलावरील केबल हटविण्यास सांगितले होते. परंतु महावितरणकडे निधी नसल्याने डोंबिवली पश्चिमेला वीज पुरवठा करणाऱ्या केबल कोणी हटवायच्या, त्यासाठी निधी कोण देणार, याविषयी पालिका, रेल्वे व महावितरण यांच्यात वाद होता.

दरम्यान, लॉकडाऊनमुळे रेल्वेसेवा बंद असल्याने पत्री पुलापाठोपाठ कोपर पुलाचेही काम हाती घेण्यात आले आहे. शुक्रवारपासून या कामास सुरुवात झाली असून पंधरा दिवसांच्या कालावधीत पुलाचा जुना ढाचा पाडण्यात येणार आहे. याच कालावधीत वीज वाहिन्या भूमिगत करण्याचे कामही महावितरणकडून सुरू आहे.

क्लिक करा : रेशन दुकानदार मालामाल, लोकप्रतिनिधींची चुप्पी

सध्या पुलावरील वीज वाहिन्यांना हात न लावता रेल्वे रुळांखालून दोन मीटर खोल भूमिगत वाहिन्या टाकण्यात येणार आहेत. उच्च दाबाच्या 9 केबल टाकण्यात येणार असून यासाठी 25 ते 30 कर्मचारी हे काम करीत आहेत. 
विद्युत वाहिन्या भूमिगत करण्यासाठी खड्डे खोदाईचे काम सुरू असून, त्यासाठी दोन मशिन मागविण्यात आल्याची माहिती महावितरणचे अधिकारी जी. एम. पाटील यांनी दिली.

रेल्वेसेवा बंद असल्याने कामास सुरुवात करण्यात आली आहे. पुलावरील केबल प्रत्यक्ष पूल पाडण्यात येईल तेव्हा हटविल्या जातील. नवीन 9 विद्युत वाहिन्या सध्या भूमिगत टाकून पश्चिमेचा वीजपुरवठा अखंडीत सुरु ठेवण्याकडे महावितरणचा कल आहे.
- धनराज बिक्कड, कार्यकारी अभियंता
 महावितरण, डोंबिवली विभाग

loading image
go to top