Ulhasnagar Accident: ट्रकची एकामागोमाग सात वाहनांना धडक, चालक फरार; थरकाप उडवणारी घटना सीसीटीव्हीत कैद

Truck Collide On 7 Vehicle: उल्हासनगरमध्ये भरधाव ट्रकने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या सात वाहनांना जोरदार धडक दिल्याची घटना घडली. या घटनेनंतर चालकाने घटनास्थळावरून पलायन केले.
Ulhasnagar Accident

Ulhasnagar Accident

ESakal

Updated on

उल्हासनगर : उल्हासनगरमध्ये भरधाव आणि बेजबाबदार अवजड वाहनांचा धोका पुन्हा समोर आला आहे. रविवारी पहाटे नेताजी चौक परिसरात भरधाव ट्रकने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या तब्बल सात वाहनांना जोरदार धडक देऊन मोठे नुकसान केले. धडक दिल्यानंतर चालकाने घटनास्थळावरून पळ काढला. संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या अपघातामुळे शहरातील अवजड वाहनांच्या बेफाम वेगावर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com