ठाण्यात अपघातांची मालिका सुरुच; आज पुन्हा मोटारीने दोन पादचाऱ्यांना उडवले...

accident
accident
Updated on

ठाणे (बातमीदार) : लॉकडाऊन शिथील झाल्याने रस्त्यावरील वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून ठाण्यात अपघातांचे सत्र सुरूच आहेत. जून महिन्याच्या पहिल्या पंधरवडयात रस्ते अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला, तर तिघे जण जखमी झाल्याची घटना घडली होती. 

या घटनेची शाई वाळत नाही तोच वसंतविहार परिसरातील पवारनगर भागात बुधवारी भरधाव कारच्या धडकेत दोन पादचारी गंभीर जखमी झाले. याप्रकरणी चितळसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशीरापर्यंत सुरू होती.

 घरखरेदीने सरकारच्या तिजोरीला मिळाला आधार; लॉकडाऊनमध्ये 'इतक्या' कोटींची महसूलप्राप्ती...​

वसंतविहार, पवारनगर येथून बुधवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास एक भरधाव कार हिरानंदानी मेडोजच्या दिशेने येत होती. त्यावेळी महिला आणि पुरूष रस्त्याकडेला चालत असताना त्यांना या कारची धडक बसली. या अपघातात दोन्ही पादचाऱ्यांना गंभीर दुखापत झाली असून त्यांना उपचारासाठी खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातातील जखमींची नावे रात्री उशीरापर्यंत कळू शकली नसून याप्रकरणी चितळसर पोलिसांनी कारचालकाला ताब्यात घेत चौकशी सुरू केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com