घरखरेदीने सरकारच्या तिजोरीला मिळाला आधार; लॉकडाऊनमध्ये 'इतक्या' कोटींची महसूलप्राप्ती...

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 17 June 2020

एका महिन्यात 1669 घरांची विक्री झाली असून सरकारच्या तिजोरीत 128 कोटी रुपयांचा महसूल जमा झाला आहे. मे महिन्यात 264 घरांची नोंदणी झाली होती; तर 1 जून ते 15 जूनपर्यंत 1405 घरांची नोंदणी झाली आहे. 

मुंबई :  लॉकडाऊनमुळे एप्रिल महिन्यांत मुंबईत एकाही घराच्या खरेदी विक्रीचे व्यवहार ठप्प झाले होते. 18 मे नंतर सुरू झालेल्या लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात मुंबईतील कंटेनमेंट झोनबाहेरील मुद्रांक शुल्क विभागाच्या कार्यालयांचे कामकाज सुरू झाले आहे. त्यानंतर एका महिन्यात 1669 घरांची विक्री झाली असून सरकारच्या तिजोरीत 128 कोटी रुपयांचा महसूल जमा झाला आहे. मे महिन्यात 264 घरांची नोंदणी झाली होती; तर 1 जून ते 15 जूनपर्यंत 1405 घरांची नोंदणी झाली आहे. 

भाजप नेता मोहित कंबोज यांच्यावर सीबीआयने केला गुन्हा दाखल; वाचा नेमकं प्रकरण काय....​

राज्य सरकारचा दररोज शंभर कोटी या प्रमाणे लॉकडाऊनच्या पहिल्या 40 दिवसांत 4 हजार कोटींचा महसूल बुडाला होता. महसूल वाढविण्यासाठी धडपडणाऱ्या सरकारने 18 मे नंतर मुंबई आणि पुणे महानगर क्षेत्रातील कार्यालये सुरू करण्याचे आदेश दिले. त्यानंतर एकूण उत्पन्नाचे आकडे वाढू लागले आहेत. राज्यात मे महिन्यांत 40 हजार 146 व्यवहारांच्या नोंदी झाल्या असून त्यातून 222 कोटींचा महसूल प्राप्त झाला आहे. तर उपनगरमध्ये 1 ते 15 जून या कालावधीत 1188  घरांच्या नोंदणीमधून जवळपास 40 कोटींचा  महसूल मिळाला आहे. 

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी, तलावक्षेत्रात पावसाची जोरदार हजेरी​

मुंबईमध्ये 217 घरांच्या नोंदणीतून 14.93 कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे. दरम्यान, मे महिन्यात उपनगरमध्ये 231 घरांच्या नोंदणीत 29 कोटी रुपये तर मुंबईतून 33 घरांच्या नोंदणीतून 44.63 कोटी  रुपयांचा महसूल सरकारला मिळाला होता.  एप्रिल महिन्यांत राज्यभरात जेमतेम 778 व्यवहार आणि 3 कोटी 11 लाखांचा महसूलाची नोंद होती. त्या तुलनेत जून महिन्यांत घर विक्रीला चांगला प्रतिसाद मिळत आहे. 

चिंताजनक बातमी! मुंबईत 'हा' परिसर ठरतोय कोरोनाचा नवा हॉटस्पॉट

मे महिना 

विभाग  घरांची नोंदणी   मुद्रांक शुल्क (कोटी रुपये) 
मुंबई शहर 33 44.63
मुंबई उपनगर 231 29.03
एकूण   264 73.66 

 

जून महिना (15 जूनपर्यंत)

विभाग  घरांची नोंदणी मुद्रांक शुल्क (कोटी रुपये)
मुंबई शहर 217  14.93
मुंबई उपनगर 1188 40.01
एकूण   1405  54.94 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: maha govt earns 128 crore revenue from housing registration amid corona lockdown