मोरचोंडीत भीषण अपघात; भरधाव ट्रक घुसली दुकानात, दोन बालकांना चिरडलं

मोखाडा  - त्र्यंबकेश्वर राज्यमार्गावर मोरचोंडी येथे झाला भीषण अपघात
Truck Accident
Truck Accidentsakal media
Updated on

मोखाडा : जव्हारहुन मोखाडा मार्गे नाशिक कडे जाणारा भरधाव ट्रक (Truck accident at morchondi) मोरचोंडी येथील बसस्थानकाजवळील चहा आणि फळविक्रीच्या दुकानात चालकाच्या विरूध्द दिशेने घुसला आहे. या भिषण अपघातात आरोही ( भुमिका) नकुल सोनार (6) आणि ऊषा भालचंद्र वारघडे (10) या दोन चिमुरडींचा (Two children death) जागेवरच मृत्यू झाला आहे. तर हर्षदा दिनेश धोंगडे  (24) आणि प्रदिप जनार्दन कडु (20) हे दोघे जणं गंभीर जखमी (two people injured) झाले आहेत. दोन्ही जखमींना मोखाडा ग्रामीण रूग्णालयातील उपचारानंतर नाशिकच्या जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे. मद्यधुंद ट्रक चालकाला मोखाडा पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. 

Truck Accident
एसटी संपामुळे बारावीच्या विद्यार्थ्यांची पायपीट; केंद्रावर पोचण्यासाठी धावपळ

मोखाडा पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, जव्हारहुन मोखाडा मार्गे नाशिक कडे मोठा दहाचाकी ट्रक भरधाव वेगाने जात होता. यावेळी मद्यधुंद अवस्थेत असलेल्या चालकाचा मोरचोंडी येथे ट्रक वरचा ताबा सुटला आणि ट्रक थेट चालकाच्या विरूध्द दिशेने  मोरचोंडी बसस्थानकाजवळील चहा आणि फळविक्रीच्या दुकानात घुसला. सदरचा अपघात दुपारी  3:30  ते  4  वाजेच्या दरम्यान घडला आहे. यावेळी आरोही ( भुमिका ) नकुल सोनार आणि ऊषा भालचंद्र वारघडे या दोन चिमुरडींना, चिरडून, दुकानाला ला उध्वस्त करून ट्रक विजेच्या खांबावर जाऊन आदळला आहे.

या अपघातात हर्षदा धोंगडे आणि प्रदिप कडु हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने मोखाडा ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, स्थिती गंभीर असल्याने दोन्ही जखमींना नाशिकच्या जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे. दरम्यान, मद्यधुंद चालकाने चपळाई करून ट्रक मागे पुढे करून तेथुन ट्रक घेऊन पळ काढला. मात्र, पुढे वाघ्याचीवाडी येथे तो पुन्हा झाडाला ठोकला आणि तेथेच ट्रक ने पेट घेतला. यावेळी संतप्त जमावाने रास्ता रोको केल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता. त्यामुळे या राज्यमार्गावरील वाहतुक शेरीचापाडा मार्गे वळविण्यात आली होती. तर मद्यधुंद ट्रक चालकाला मोखाडा पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com