Advocate Sanjay Ghadigaonkar
sakal
ठाणे - राजकीय पक्ष फोडणे, लोकप्रतिनिधींची खरेदी-विक्री करणे आणि सत्तेसाठी पडद्यामागे छुप्या रणनीती आखणे ही केवळ राजकीय खेळी नसून लोकशाहीच्या मूलभूत तत्त्वांवर घाला घालणारी संघटित प्रवृत्ती असल्याची टीका अॅड. संजय घाडीगांवकर यांनी केली आहे. अशा प्रकारच्या राजकारणामुळे मतदारांचा विश्वास डळमळीत होत असून लोकशाही व्यवस्थेचे नुकसान होत असल्याचे घाडीगांवकर यांनी स्पष्ट केले.