ठाण्यातील 'या' तीन परिसरात नागरिकांनीच पुकारला 'लॉकडाऊन', फक्त अत्यावश्यक सेवा सुरु

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 जून 2020

सोमवारपासून पुढील सात दिवस उस्फूर्तपणे लॉकडाऊन पुकारला आहे. यामध्ये केवळ मेडिकल, हॉस्पिटल आणि दुध व्यवसायच सुरु ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. 

ठाणे : ठाणे शहरातील लॉकडाऊनबाबत प्रशासनाकडून सावळागोंधळ सुरु असताना; माजिवडा- मानपाडा प्रभाग समितीच्या अंतर्गत येत असलेल्या कोलशेत, ढोकळी आणि बाळकूम परिसरात लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनीच सोमवारपासून पुढील सात दिवस उस्फूर्तपणे लॉकडाऊन पुकारला आहे. यामध्ये केवळ मेडिकल, हॉस्पिटल आणि दुध व्यवसायच सुरु ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. 

ही बातमी वाचली का? मुंबईकर... मास्क लावा, नाहीतर हजार रुपये तयार ठेवा...

माजिवडा-मानपाडा प्रभाग समितीच्या हद्दीत सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्णांची नोंद होत असल्याने येथील रहिवाशांमध्ये चिंता वाढली होती. वाढत्या रुग्णसंख्येमुळे शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक संजय भोईर यांनी बाळकूम, कोलशेत आणि ढोकाळी परिसरातील काही सोसायटी आणि झोपडपट्टीत राहणाऱ्या नागरिकांची बैठक घेऊन स्वयंस्फूर्तीने लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे.

महत्वाची बातमी : वेब सीरिज बघताय जरा सावध व्हा, नाहीतर तर होऊ शकतं हे...

त्यानुसार सोमवारपासून पुढील सात दिवस लॉकडाऊन असणार आहे. या लॉकडाऊनची प्रभावीपणे अंमलबजावणी होण्यासाठी केवळ अत्यावश्यक सेवा, मेडिकल, हॉस्पिटल, रुग्णवाहिका तसेच दूध व्यवसाय (सकाळी 5 ते 8 वाजेपर्यंत) वगळून सर्व प्रकारचे किराणा स्टोअर्स, भाजीपाला, मच्छी विक्रते, मटण- चिकन विक्रते सात दिवस बंद राहणार असल्याची माहिती भोईर यांनी दिली.

Spontaneous lockdown of citizens in these three areas of Thane, only essential services started


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Spontaneous lockdown of citizens in these three areas of Thane, only essential services started