नूतनीकरण होताच '...या' नाट्यगृहात पाय ठेवायला जागा नाही!

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 12 February 2020

नूतनीकरणांनतर वाशी, सेक्‍टर 16 ए येथील नवी मुंबई महापालिकेच्या विष्णुदास भावे नाट्यगृहाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. सद्यस्थितीत मार्च महिन्यापर्यंतची आरक्षणे पूर्ण झाली आहेत; तर एप्रिल, मे व जून महिन्यांची आगाऊ आरक्षणांसाठी निवेदने येण्यास सुरवात झाली आहे. 

नवी मुंबई : वाशी, सेक्‍टर 16 ए येथे नवी मुंबई महापालिकेचे विष्णुदास भावे हे एकमेव नाट्यगृह आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीला या नाट्यगृहाच्या नूतनीकरणाचे काम पूर्ण झाले आणि 1 जानेवारीला त्याची तिसरी घंटा वाजली. नूतनीकरणांनतर या नाट्यगृहाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. सद्यस्थितीत मार्च महिन्यापर्यंतची आरक्षणे पूर्ण झाली आहेत; तर एप्रिल, मे व जून महिन्यांची आगाऊ आरक्षणांसाठी निवेदने येण्यास सुरवात झाली आहे. 

ही बातमी वाचली का? मोदींची तुलना पुन्हा छत्रपतींशी!

भावे नाट्यगृहाच्या झालेल्या दुरवस्थेमुळे, त्याच्या दुरुस्तीचे काम नवी मुंबई महापालिकेने हाती घेतली होते. त्यामुळे या नाट्यगृहाच्या नूतनीकरणासाठी 11 मार्च 2019 पासून ते बंद करण्यात आले होते. या दहा महिन्यांच्या कालावधीत पालिकेकडून 11.50 कोटी रुपये खर्चून नाट्यगृहाचा चेहरामोहरा बदलण्यात आला आणि पालिकेच्या वर्धापनदिनाचे (1 जानेवारी) औचित्य साधून, नाट्यगृहाची पुन्हा एकदा तिसरी घंटा वाजली. विष्णुदास भावे नाट्यगृह पुन्हा सुरू झाल्यांनतर त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. नाट्यगृहातील मार्च महिन्यापर्यंतची सर्व आरक्षणे पूर्ण झाली आहेत. जानेवारी महिन्यामध्ये 59 कार्यक्रम झाले. या कार्यक्रमांमधून पालिकेला 20 लाखांचा महसूल मिळाला; तर फेब्रुवारी महिन्याच्या 10 तारखेपर्यंत 25 कार्यक्रम झाले असून, त्यामधून पालिकेला चार लाख रुपयांचा महसूल मिळाला आहे; तर एप्रिल, मे व जून महिन्यांची आरक्षणासाठी निवेदने येणे सुरू झाले आहे, अशी माहिती पालिका प्रशासनाने दिली. 

ही बातमी वाचली का? अबब...25 टन जवला

पालिकेच्या विष्णुदास भावे नाट्यगृहाच्या नूतनीकरणांनतर त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. मार्च महिन्यापर्यंतचे सर्व आरक्षणे पूर्ण झाली असून, आगाऊ तारखा घेण्यात येत आहेत. 
- नितीन काळे, उपायुक्त, नवी मुंबई महापालिका 

नवी मुंबई महापालिकेकडून भावे नाट्यगृह उत्तम पद्धतीने बनवण्यात आले आहे. नूतनीकरणानंतर तर त्याचा चेहरामोहरा बदलला आहे. 
- अशोक पालवे, नाट्यकर्मी 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Spontaneous response of Vishnudas Bhave theater Navi Mumbai Municipal Corporation after renewal