esakal | धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या रझा अकादमीवर बंदी घाला, भाजपची मागणी
sakal

बोलून बातमी शोधा

धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या रझा अकादमीवर बंदी घाला, भाजपची मागणी

फ्रान्समध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कडक शब्दांत निषेध केला आहे.

धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या रझा अकादमीवर बंदी घाला, भाजपची मागणी

sakal_logo
By
कृष्ण जोशी

मुंबई, ता. 30 : मुंबईत भेंडीबाजार येथे फ्रान्सच्या पंतप्रधानांचे फोटो रस्त्यावर लावून निषेध करणाऱ्या रझा अकादमीच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत आणि रझा अकादमीवर बंदी घालण्याची हिंमत दाखवावी, अशी मागणी भाजप कडून केली जातेय. भाजपचे नेते आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे तशी मागणी केली आहे.

फ्रान्समध्ये मुस्लिम धर्माचा अवमान झाल्याचा दाखला देत ही निदर्शने करण्यात आली. मात्र चीनच्या उघीर प्रांतात गेली अनेक वर्षे मुस्लिम समाजावर अत्याचार होत आहेत. त्याविरोधात रझा अकादमीने केव्हाही निषेधाचा आवाज उठवला नाही, असेही भातखळकर यांनी दाखवून दिले आहे.  

महत्त्वाची बातमी दरेकरांचा तटकरेंविरुद्ध शड्डू, जशास तसे उत्तर देण्याचा इशारा

फ्रान्समधील घटनांच्या निषेधार्थ मुंबईतील भेंडी बाजारात भ्याड निदर्शने करणाऱ्या रझा अकादमीचे हे कृत्य खरेतर देशद्रोही स्वरूपाचेच आहे. दहशतवादाचा धिःक्कार करणाऱ्या फ्रान्सच्या पंतप्रधानांचा या निदर्शनांच्यावेळी निषेध करण्यात आला. दहशतवादाविरुद्ध बोलणाऱ्या व्यक्तीचा अशा प्रकारे निषेध करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करून त्यांना तात्काळ अटक करण्यात आली पाहिजे. त्याचप्रमाणे असे कृत्य करणाऱ्या रझा अकादमीवर बंदी घालण्याची हिम्मत राज्य सरकारने दाखवावी अशी मागणीही भातखळकर यांनी केली आहे.

फ्रान्समध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कडक शब्दांत निषेध केला आहे. आज चीनकडून होत असलेल्या कुरघोड्यांना सडेतोड उत्तर देणाऱ्या भारतासोबत खांद्याला खांदा लावून उभे राहणाऱ्या फ्रान्सच्या पंतप्रधानांच्या विरोधात महाराष्ट्रात रझा अकादमीचे कार्यकर्ते निषेध करत आहे. या संदर्भात शिवसेनेची भूमिका काय आहे, हे शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी स्पष्ट करावे असेही भातखळकर यांनी म्हटले आहे.

( संपादन - सुमित बागुल )

for spreading communal tension ban raza academy bjp leader atul bhatklahar demands