'स्पुटनिक व्ही' लस  कोरोना विरोधातील पहिली नोंदणीकृत लस ठरणार

'स्पुटनिक व्ही' लस  कोरोना विरोधातील पहिली नोंदणीकृत लस ठरणार

मुंबई: कोरोनावर मात करणाऱ्या रशियातील 'स्पुटनिक व्ही लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील क्लिनिकल चाचणी यशस्वी झाली आहे. वैद्यकीय लॅन्सेट या नियतकालिकाने याबाबतची माहिती प्रसिद्ध केली आहे. यामुळे लशीची परिणामकारकता आणि सुरक्षितता यांवर शिक्कामोर्तब झाले असून ही लस लवकरच बाजारात दाखल होणार आहे. 

स्पुटनिक व्ही ही लस सखोल अभ्यास झालेल्या मानवी अॅडेनोव्हायरल व्हेक्टर्स प्लॅटफॉर्मवर आधारित असून, कोरोना विषाणू विरोधातील ही जगातील पहिली नोंदणीकृत लस ठरली आहे.

क्लिनिकल चाचणीसाठी 19,866 स्वयंसेवकांचा डेटा समाविष्ठ करण्यात आला होता. यातील 14,964 जणांना लस, तर 4902 जणांना प्लसिबो देण्यात आले. 21 दिवसांच्या अंतराने दिल्या गेलेल्या स्पुटनिक व्हीच्या दुहेरी डोस उपचारांची कोविड-19 विरोधातील परिणामकारकता 91.6 टक्के दिसून आली. ही मोजणी कोविड-19च्या 78 कन्फर्म्ड केसेसच्या विश्लेषणाच्या आधारे करण्यात आली. या रुग्णांपैकी 62 जण प्लसिबो गटातील तर 16 जण लस दिलेल्या गटातील होते. स्पुटनिक व्हीमुळे दमदार स्वरूपाचा ह्युमोरल आणि सेल मेडिएटेड रोगप्रतिकार प्रतिसाद निर्माण झाल्याचे दिसून आले.

“स्पुटनिक व्हीच्या क्लिनिकल चाचण्यांची निष्पत्ती आंतरराष्ट्रीय स्तरावर परीक्षण करणाऱ्या नियतकालिकात प्रसिद्ध करण्यात आली. हे कोविड-19 साथविरोधी लढ्यामधील मोठे यश आहे. रशियातील लशीची सुरक्षितता आणि उच्च परिणामकारकता सादर करण्यात आलेल्या शास्त्रीय डेटातून दिसून येते अशी प्रतिक्रिया
गॅमालिया रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ एपिडेमिओलॉजी अँड मायक्रोबायोलॉजीचे संचालक अलेक्झांडर गिन्स्टबर्ग यांनी दिली. 

ही लस तीव्र स्वरूपाच्या कोविड-19 पासून संपूर्ण संरक्षण करते. हे स्वतंत्र्यरित्या जमवलेल्या तसेच परीक्षण करण्यात आलेल्या डेटावरून स्पष्ट होते. 90 टक्क्यांहून अधिक परिणामकारक ठरलेल्या जगातील तीन लशींपैकी स्पुटनिक व्ही ही एक आहे असे रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंडाचे सीईओ किरिल दिमित्रेव म्हणाले.

लॅन्सेटमध्ये प्रसिद्ध झालेल्या माहितीमुळे स्पुटनिक व्ही ही जगातील पहिली नोंदणीकृत लस आहे. शिवाय, ही लस सर्वोत्तम लशींपैकी एक असल्याचेही यातून स्पष्ट झाले आहे.  मात्र सुरक्षितता, साठवणीसाठी +2 ते +8 अंश सेल्सिअस तापमान पुरेसे असल्यामुळे वाहतुकीतील सुलभता आणि परवडण्याजोगी किंमत या निकषांवर स्पुटनिक व्ही या अन्य लशींवर मात करते. स्पुटनिक व्ही ही अखिल मानवजातीसाठी असलेली लस आहे असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

या लसीचे वैशिष्ट्य म्हणजे ही लस नवीन कोरोनाविषाणू प्रादुर्भावाच्या अत्यंत तीव्र केसेसमध्येही पूर्ण संरक्षण देते. चाचण्यांचा अभ्यास केला असता लसीकरणानंतर 7 ते 14 दिवसांच्या काळात लशीची परिणामकारकता वाढून 50 टक्के झाली, 14 ते 21 दिवसांच्या काळात ती 74.1 टक्के झाली आणि 21 व्या दिवसापासून ती कोरोना विषाणूच्या तीव्र लक्षणांविरोधात संरक्षणाबाबत 100 टक्के झाली.

या अभ्यासातील 2,144 स्वयंसेवक 60 वर्षांवरील वयोगटातील होते. लस गटातील सर्वांत वृद्ध व्यक्ती 87 वर्षांची, तर प्लसिबो गटातील सर्वांत वृद्ध व्यक्ती 84 वर्षांची होती. त्यामुळे वयोवृद्धांसाठीही ही लस अत्यंत सुरक्षित असल्याचे स्पष्ट झाले आहे. लशीची परिणामकारकता वृद्धांमध्ये 91.8 टक्के होती. 

स्पुटनिक व्ही लस दिली जाते. तेव्हा कोरोनाविषाणूही शरीरात प्रवेशच करत नाही. कारण, लशीच्या बाहेरील प्रोटिन आवरणातच त्याच्या जनुकीय माहितीचा एक भाग असतो, याला ‘स्पाइक्स’ असे म्हटले जाते. यामुळे लसीकरणानंतर विषाणूचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता पूर्णपणे नाहीशी होते आणि शरीरामध्ये स्थिर रोगप्रतिकार प्रतिसाद निर्माण होईल, अशी परिस्थिती निर्माण केली जाते.

स्पुटनिक व्हीची 16 देशांमध्ये यापूर्वीच नोंदणी झाली आहे. त्यामध्ये रशिया, बेलारूस, सर्बिया, अर्जेंटिना, बोलिव्हिया, अल्जेरिया, पॅलेस्टाइन, व्हेनेझुएला, पॅराग्वे, तुर्कमेनिस्तान, हंगेरी, यूएई, इराण, गयाना, ट्युनिशिया आणि आर्मेनिया या देशांचा समावेश आहे. तर बोलिव्हिया, कझाकस्तान, तुर्कमेनिस्तान,  पॅलेस्टाइन,  यूएई,  पॅराग्वे,  हंगेरी,  आर्मेनिया, अल्जेरिया, बोस्नियन सर्ब, व्हेनेझुएला आणि इराण या देशांमध्ये लवकरच नोंदणी होणार आहे. नागरिकांमध्ये प्रसारासाठी मंजुरी मिळालेली स्पुटनिक व्ही ही पहिली कोरोना विषाणूविरोधातील लस असेल.

---------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Sputnik V vaccine will first registered vaccine against corona virus

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com