

Mumbai Housing Project
ESakal
मुंबई : विकास नियंत्रण नियमावली ३३ (१०) नुसार पुनर्विकास प्रकल्पाच्या माध्यमातून एसआरए प्राधिकरणाला मिळणाऱ्या सदनिका शिवशाही पुनर्वसन प्रकल्पाला देण्याचा 'एसआरए'चा ठराव आहे. मात्र, गेल्या वर्षभरात उपलब्ध झालेली सुमारे १,२०० घरे शिवशाहीला देताना एसआरएने हात आखडता घेतला आहे. यावरून 'एसआरए'ला आपल्याच ठरावाचा विसर पडला असल्याचे शिवशाहीच्या अधिकाऱ्यांचे मत आहे.