कोरोनाचा कहर! मुंबईत उपनिरिक्षकाचा कोरोनामुळे मृत्यू; SRPF मध्ये होते कार्यरत.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

corona

मुंबईत बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या राज्य राखीव पोलिस दलाच्या(एसआरपीएफ) एका पोलिस उपनिरीक्षकाचा रविवारी कोरोनामुळे मृत्यू झाला. जालन्यावरून बंदोबस्तासाठी ते मुंबईत आले होते.

कोरोनाचा कहर! मुंबईत उपनिरिक्षकाचा कोरोनामुळे मृत्यू; SRPF मध्ये होते कार्यरत..

मुंबई: मुंबईत बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या राज्य राखीव पोलिस दलाच्या(एसआरपीएफ) एका पोलिस उपनिरीक्षकाचा रविवारी कोरोनामुळे मृत्यू झाला. जालन्यावरून बंदोबस्तासाठी ते मुंबईत आले होते.

हेही वाचा: "56 इंच छाती दाखवण्याची हीच वेळ"; राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्षांचा मोदींना टोला..  

मृत 51 वर्षीय उपनिरीक्षक राज्य राखीव पोलिस दलाच्या गट तीनमध्ये कार्यरत होते. रविवारी उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. 21 जूनला उपचारासाठी त्यांना सेव्हन हिल्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मुंबईत कार्यरत 82 राज्य राखीव पोलिस दलाच्या जवानांनाही आतापर्यंत कोरोनाची लागण झाली आहे. पाच अधिकारी व 77 जवानांचा समावेश आहे.

मुंबईत आतापर्यंत 2395 पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 1667 पोलिसांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे कोरोनावर मात केलेल्या पोलिसांचा आकडे 65 टक्क्यांहून अधिक आहे. त्यातील 722 जण कर्तव्यावर पुन्हा रूजू झाले आहे. 282 पोलिस उपचारानंतर सध्या घरी आहेत, तर 663 पोलिस लवकरच कर्तव्यावर रूजू होणार आहेत.

हेही वाचा:  मुंबईतील 'या' चार विभागांमध्ये  पुन्हा लॉकडाऊन करा; पोलिसांचा महापालिकेपुढे प्रस्ताव

मुंबईत पोलिसांसाठी चार कोविड केअर सेंटरची स्थापना करण्यात आली आहे. या कोविड केअर सेंटरमध्ये 452 पोलिस  उपचार घेत आहेत. तर 205 जणांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यता आले आहे. याशिवाय 35 पोलिसांना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. याशिवाय इतर प्रतिबंधात्मक साहित्य व औषधांचे वाटपही पोलिसांना करण्यात आले आहे.

SRPF oficer is no more due to corona 

Web Title: Srpf Oficer No More Due Corona

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top