परीक्षेचं वेळापत्रक जाहीर; दहावी, बारावीची फेरपरीक्षा 20 नोव्हेंबरपासून

तेजस वाघमारे
Tuesday, 20 October 2020

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी, बारावीच्या फेरपरीक्षांचे वेळापत्रक आज (मंगळवार, ता.20 ) जाहीर केले आहे.

मुंबई : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी, बारावीच्या फेरपरीक्षांचे वेळापत्रक आज (मंगळवार, ता.20 ) जाहीर केले आहे. 20 नोव्हेंबरपासून लेखी तर 18 नोव्हेंबरपासून तोंडी, प्रात्यक्षिक आणि श्रेणीविषयाच्या परीक्षा सुरू होणार आहेत.

दहावीची परीक्षा 5 डिसेंबरपर्यत तर बारावीच्या सर्वसाधारण व द्विलक्षी अभ्यासक्रमाची परीक्षा 10 डिसेंबरपर्यंत घेण्यात येणार आहे. तसेच बारावीच्या व्यवसाय अभ्यासक्रमाची परीक्षा 7 डिसेंबरपर्यत सुरू राहणार आहे.

महत्त्वाची बातमी : दाऊदचा विश्वासू इकबाल मिर्चीच्या कुटुंबियांच्या मालमत्तेवर टाच; ईडीची कारवाई

या विद्यार्थ्यांच्या तोंडी, श्रेणी आणि प्रात्यक्षिक परीक्षा शाळा, महाविद्यालय स्तरावर होणार असून दहावीच्या परीक्षा या 5 डिसेंबरपर्यंत तर बारावीच्या परीक्षा 10 डिसेंबरपर्यत घेण्यात येणार आहेत.

परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक www.mahahsscboard.in या वेबसाईटवर विद्यार्थ्यांच्या माहितीसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे.

शिक्षण मंडळाच्या वेबसाईटवर उपलब्ध असलेले हे तात्पुरत्या स्वरूपात विद्यार्थ्यांच्या माहितीसाठी असून शाळा, महाविद्यालयामधून मिळणाऱ्या छापील वेळापत्रकानुसारच विद्यार्थ्यांनी परीक्षा द्यावी असं आवाहन राज्य शिक्षण मंडळाचे सचिव डॉ.अशोक भोसले यांनी केले आहे.

महत्त्वाची बातमी : लोकल सर्वांसाठी सुरु करण्याच्यादृष्टीने महत्त्वाची पावलं, रेल्वे अधिकाऱ्यांसोबत महत्त्वाची बैठक

इतर कोणत्याही माध्यमातून मिलळलेलं वेळापत्रक ग्राह्य धरू नये असे आवाहन ही राज्य शिक्षण मंडळाकडून करण्यात आलंय.

( संपादन - सुमित बागुल ) 

ssc and hsc re exams timetable published by maharashtra ssc board 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ssc and hsc re exams timetable published by maharashtra ssc board