
Shivsena Eknath Shinde: एसटी बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत राडा झाल्याची माहिती आहे. शिवसेना शिंदे गट आणि अॅड. गुणरत्न सदावर्ते गट हे दोन्ही गट एकमेकांना भिडले आणि तुफान हाणामारी झाली.
अडसूळ यांचा शिंदे गट आणि सदावर्ते गट यांच्या आधीपासूनच बेबनाव आहे. यापूर्वी सदावर्ते यांच्यावर गैरव्यवहाराचे आरोप आधीच झालेले आहेत. मात्र आजचा राडा हा अपमानास्पद बोलल्या गेल्याने झाल्याची प्राथमिक माहिती आहे.