esakal | विक्रमगडमध्ये दोन एसटी बसची समोरासमोर धडक, ५० प्रवासी जखमी
sakal

बोलून बातमी शोधा

विक्रमगडमध्ये दोन एसटी बसची समोरासमोर धडक, ५० प्रवासी जखमी

विक्रमगडमध्ये दोन एसटी बसची समोरासमोर धडक, ५० प्रवासी जखमी

sakal_logo
By
अमोल सांबरे

विक्रमगड: पालघर जिल्ह्यातील विक्रमगड (vikramgad) तालुक्यातील आलोंडे-कोकणी पाडा येथील राईसमील जवळ एसटी बसचा भीषण अपघात (st bus accident) झाला. डहाणू-ठाणे व वाडा-जव्हार एसटी बसची समोरासमोर धडक झाली. सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास हा भीषण अपघात झाला.

या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी दोन्ही बसमधील 50 प्रवासी किरकोळ तसेच गंभीर जखमी झाले आहेत. सकाळी 9 च्या सुमारास विक्रमगड वरून वाडा कडे जाणारी डहाणू-ठाणे तसेच वाडा वरून येणारी जव्हार-वाडा एसटी बस कोकणी पाडा येथे परस्परांना धडकल्या. या वेळी स्थानिक नागरिकांच्या मदतीने बस मधील प्रवाशाना तातडीने वाडा येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

loading image
go to top