esakal | एक्स्प्रेस हायवेवरील एसटी बस अपघात चालकाच्या चुकीमुळेच! पोलिस तपासाअंती सत्य समोर
sakal

बोलून बातमी शोधा

एक्स्प्रेस हायवेवरील एसटी बस अपघात चालकाच्या चुकीमुळेच! पोलिस तपासाअंती सत्य समोर
  • द्रुतगती महामार्गावरील अपघात बस चालकाच्या चुकीमुळेच 
  • एसटी चालकाची चूक बेस्ट ड्रायव्हर च्या जिवावर बेतली
  • दिवाळी सुट्टी संपून ड्युटीवर जात असता बेस्ट ड्रायव्हर वर काळाचा घाला.

एक्स्प्रेस हायवेवरील एसटी बस अपघात चालकाच्या चुकीमुळेच! पोलिस तपासाअंती सत्य समोर

sakal_logo
By
वसंत जाधव

नवीन पनवेल - मुंबई पनवेल द्रुतगती महामार्गावरील सातारा बसला झालेला अपघात हा बस चालकाच्या चुकीमुळे झाल्याचे तपासामध्ये समोर आले आहे. बस चालकाची कसून चौकशी केली असता त्याने चुकिच्या पद्धतीने ओव्हरटेक करण्याच्या नादात अपघात झाल्याचे कबूल केले आहे. त्यामुळे फिर्यादीच आरोपी निघाल्याचे निष्पन्न झाले आहे. अपघात एका प्रवाशाचा मृत्यू झाला असून 13 जण जखमी झाले होते. जखमींना कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, पैकी 11 जणांना रुग्णालयातून सोडण्यात आले असून 2 जणांनी प्रकृती चिंताजनक आहे.

हेही वाचा - कराची बेकरीचे मालक फाळणीतील हिंसेचे बळी; मनसेच्या नोटीशीला दिले उत्तर

गुरूवारी (ता.26) रोजी सातारा परेल आगाराची एसटी बस सातार्या वरून मुंबई ला 17 प्रवासी घेवून जात होती. या बसला  मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर पनवेल ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये ओव्हरटेकच्या नादात ट्रेलरला एसटी घासल्याने   अपघात झाला होता, यामध्ये गणेश कदम (36) या प्रवाशाचा मृत्यू झाला होता. अशी तक्रार पनवेल ग्रामीण पोलीस स्टेशन मध्ये एसटी बस चालक जगन्नाथ राऊत(48)यांनी केली होती, त्या अनुषंगाने ट्रेलर अज्ञात ट्रेलर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. परंतु पनवेल तालुका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र दौंडकर पोलीस उप निरीक्षक सुनिल गुरव यांनी या प्रकरणाचा तपास करून ट्रेलर चालकाला ताब्यात घेवून चौकशी केली असता बस चालकाच्या बसचालकाने चुकीच्या पद्धतीने ओव्हरटेक केल्यामुळे अपघात झाल्याचे तपासाअंती समोर आले. अपघातातील मृत गणेश कदम हे बेस्ट ड्रायव्हर आहेत दिवाळीची सुट्टी संपून मुंबई  ड्युटीवर जात असता त्यांच्यावर काळाने घातला आहे. 

हेही वाचा - आमची राष्ट्रपती राजवट लावण्याची मागणी नाही पण... ! देवेंद्र फडणवीसांची मुख्यमंत्र्यांवर टीका

पहाटे दीडच्या सुमारास ट्रेलर चालकाने बेदरकारपणे गाडी चालवून एसटी बसला धडक देऊन निघून गेल्याची तक्रार बस चालक जगन्नाथ राऊत यांनी पोलिसात केली होती. मात्र स्वतःच्या चुकीचे खापर ट्रेलर चालकावर फोडण्याच्या नादात तपासाअंती फिर्याद खोटी असल्याचे समोर आले, सत्य समोर येतात पोलिसांनी बस चालक जगन्नाथ राऊत याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.

ST bus accident on express highway due to drivers mistake Police investigation revealed the truth

-----------------------------------------------------
( संपादन - तुषार सोनवणे )

loading image