
मुंबई : हकीम समितीच्या शिफारशीनुसार एसटी महामंडळाची (ST bus corporation) भाडेवाढ करण्यासाठी राज्याचे अप्पर मुख्य सचिवांच्या (additional chief secretary) अध्यक्षतेखाली असलेली राज्यस्तरीय परिवहन समितीचा (state transport study) अभ्यास अंतिम (final stage) टप्यात पोहचला आहे. लवकरच समितीचा अहवाल एसटी महामंडळाच्या संचालक मंडळापुढे सादर करण्यात येणार असून, सुमारे 17 टक्के भाडेवाढ (rent increases) होऊन, भाड्यात 5 रुपयांची वाढ होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे.
यापूर्वी एसटीची भाडेवाढ सहा किलोमीटरच्या टप्प्यानंतर होत असते. मात्र, यावेळी किलोमीटरच्या टप्यात वाढ होणार असून, 100 किलोमीटरपर्यंत साधारण 25 रुपयांपर्यंतची वाढ होणार आहे. कोरोना महामारीमुळे एसटी महामंडळाचा तोटा सुमारे 7 हजार कोटी पेक्षा जास्त झाला आहे. त्यातच निव्वळ डिझेल आणि स्पेअर स्पार्ट, महागाई भत्यांमुळे महिन्याला सुमारे 958 कोटींचा अतिरिक्त बोजा सहन करावा लागतो आहे. त्यामुळे भाडेवाढीमुळे एसटी महामंडळाला दिलासा मिळणार असल्याचे तज्ञांकडून सांगितल्या जात आहे.
हकीम समितीच्या शिफारशी नुसार महागाईच्या आधारावर भाडेवाढ करता येत असल्याने, डिझेलचे दर 10 टक्यांपेक्षा जास्त वाढल्यास, टायरचे दर, कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता आणि स्पेअर पार्टच्या महागाईचे निकषांचा अभ्यास केला जातो. तर जून 2018 मध्ये करण्यात आलेली शेवटची भाडेवाढ करतांना असलेल्या महागाईचा सुद्धा अभ्यास करून राज्याची परिवहन समिती आपला अहवाल लवकरच सादर करणार असल्याचे परिवहन विभागातील विश्वसनीय सूत्रांनी सांगितले आहे.
तोटा भरून काढण्याचा प्रयत्न
सध्या एसटीच्या प्रवासी वाहतुकीतून महिन्याला 150 कोटींचे उत्पन्न होत असले तरी वार्षिक फक्त 1800 कोटी होत आहे. यामध्ये मालवाहतूक आणि इतर उत्पन्न मिळवूनही सुमारे 2000 कोटींचे उत्पन्न महामंडळाला वार्षिक मिळते आहे. मात्र, त्यातुलनेत एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनावर सुमारे वार्षिक 3600 कोटी आणि डिझेलवर 3 हजार कोटी मिळून एकत्र 6 हजार 600 कोटींचा खर्च आहे. त्यामुळे सुमारे 4 हजार 600 कोटींची तूट सध्याच्या उत्पन्नावर भरून निघणे अशक्य असल्याचे दिसून येत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.