ST Bus Travel: एसटीला ‘एल्फिन्स्टन’चा फटका! प्रवासीसंख्येत १० टक्क्यांनी घट; उत्पन्नावर पाणी
Elphinstone Bridge Construction: एल्फिन्स्टन पुलाच्या पाडकामास सुरु केले असून येथील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. यासाठी पर्यायी मार्ग काढले आहेत. मात्र यामुळे सहा किमीचे अंतर वाढल्याने त्याच फटका एसटीच्या प्रवासीसंख्येत बसत आहे. एसटी प्रवासीसंख्येत १० टक्के घट झाली असून एसटीचे उत्पन्न कमी होत आहे.
मुंबई : एल्फिन्स्टन पुलाच्या पाडकामासाठी रस्ते वाहतूक इतर मार्गावरून वळविण्यात आली आहे; मात्र त्यामुळे सहा किमीचे अंतर वाढल्याने एसटीच्या प्रवासीसंख्येत १० टक्के घट झाली असून, एसटीला दररोज एक लाखाच्या उत्पन्नावर पाणी सोडावे लागत आहे.