..अन लालपरी धावली रिकामीच;एसटीकडे प्रवाशांनी फिरवली पाठ;

st bus
st bus

मुंबई: राज्यात कोरोनाच्या पार्श्वभुमीवर एसटी महामंडळाची सेवा सुमारे दोन महिन्यांपासून बंद आहे. त्यानंतर आता एसटीने 22 मे पासून राज्यातील जिल्ह्यांच्या अंतर्गत सेवा सुरू झाल्या आहे. पहिल्याच दिवशी 457 गाड्यांच्या मार्फेत निवडक मार्गांवर 2007 फेऱ्या धावल्या आहे. मात्र, यामध्ये प्रत्येक एसटी डेपोमध्ये उत्पन्नापेक्षा डिझेल आणि नियोजनाचा खर्चच जास्त झाल्याचे दिसून येत आहे.

एसटी महामंडळाचा सहा हजार कोटी पेक्षा जास्त संचित तोटा झाल्याचा दावा, एसटी महामंडळाकडून वेळोवेळी केला जात आहे. त्यात खिळखिळ्या एसटी आणि अपघाती शिवशाहीमूळे एसटीच्या प्रवासी संख्येत घट झाली आहे. अशातच गेल्या दोन महिन्यांपासून राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढल्याने एसटी सेवा बंद आहे. त्यामूळे निव्वळ प्रवासी उत्पन्नावर अवलंबून असलेल्या एसटी महामंडळाच्या तिजोरीत खळखळाट आहे. 

दोन महिन्यानंतर पुन्हा एकदा एसटी महामंडळाने एसटीची जिल्ह्यांतर्गंत सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला खरा, मात्र प्रवासीच मिळत नसल्याने, अनेक जिल्ह्यांमध्ये रिकाम्या बस फिरतांना दिसून येत आहे. तर अनेक बस मध्ये एक ते दोन प्रवाशांसाठी धावतांना दिसून येत आहे. त्यामुळे डिझेल आणि त्याच्या नियोजनाचा खर्च एसटीला उचलावा लागत असतांना, उत्पन्न मात्र कमी होत असल्याचे अनेक एसटी डेपो प्रशासनाने सोशल माध्यमांवर सुद्धा जाहीर केले आहे. 

लाॅकडाऊननंतर ही एसटीची वाट बिकट:

कोरोनामूळे प्रवासी सार्वजनिक वाहनांनी प्रवास करने टाळतांना दिसून येत आहे. खासगी वाहने किंवा, दुचाकीने नागरिकांचा प्रवास वाढला आहे. त्यामुळे लाॅकडाऊनंतर एसटीला प्रवासी मिळणार का ? असा ही प्रश्न उपस्थित होत आहे. प्रवासी न मिळाल्यास एसटीच्या तोट्यात मात्र प्रचंड वाढ होण्याची शक्यता आहे. 

उत्पन्नाचा उन्हाळी हंगाम रिकामा:

उन्हाळ्यातील 15 एप्रील ते 15 जुन पर्यंत एसटी महामंडळाचा उत्पन्नाचा हंगाम असतो, या काळात राज्यात लग्न समारंभ, सहली, पर्यटन यासह अनेक गोष्टींसाठी उन्हाळात एसटीची बुकिंग केली जाते. मात्र यावर्षी संपुर्ण उन्हाळा कोरोनाच्या पार्श्वभुमीवर लाॅकडाऊन असल्याने, एसटी महामंडळाचा हंगाम रिकामा गेल्याने एसटीचे उत्पन्न बुडाले आहे.

ST bus is in trouble as there is no passengers in bus read full story 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com