'एसटी प्रवासी वाढले फेऱ्या मात्र अपुऱ्या'; मुंबई सेंट्रल बस आगारात प्रवाशांची गर्दी

'एसटी प्रवासी वाढले फेऱ्या मात्र अपुऱ्या'; मुंबई सेंट्रल बस आगारात प्रवाशांची गर्दी

मुंबई : सरसकट प्रवाशांना लोकल प्रवासाची परवानगी नसल्याने, उपनगरातील सामान्य प्रवाशांना कामावर जाण्यासाठी त्रास सहन करावा लागतो आहे. वसई, विरार, पालघर, कल्याण येथून मुंबईत येणाऱ्या प्रवाशांची संख्या सर्वात जास्त आहे. त्यामूळे परतीच्या प्रवासासाठी मुंबई सेंट्रल एसटी बस स्थानकांवर प्रवाशांची गर्दी वाढतांना दिसून येत असून, एसटीच्या अपुऱ्या फेऱ्यांमूळे मात्र, दाटीवाटीने जिव मुठीत धरून कोरोना काळात प्रवास करावा लागतो आहे.

गेल्या काही दिवसांमध्ये मुंबई सेंट्रल एसटी बस आगारामध्ये वसई, विरार, पालघर, कल्याण जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी वाढली आहे. रोजगारासाठी सकाळी मुंबईत येणाऱ्यांची संख्या वाढली, मात्र, लोकल सेवेत सामान्य प्रवाशांना परवानगी नसल्याने एसटी किंवा खासगी वाहनाचा पर्याय शोधावा लागतो आहे. त्यातही एसटीची प्रवासी सेवा सुरक्षीत आणि स्वस्त असल्याने, एसटीच्या प्रवाशांमध्ये वाढ झाली मात्र, फेऱ्याच कमी असल्याने प्रवाशांना तासंतास बसची वाट बघावी लागते आहे. 

मुंबई सेंट्रल स्थानकावरून दिवसभरात सुमारे 19 बसेस सुटतात.मात्र, दैनंदिन होणाऱ्या  गर्दी बघता एसटीच्या फेऱ्या कमी असल्याचे मुंबई सेंट्रल बस स्थानकांवरील वाहतूक नियंत्रकांकडूनच सांगितल्या जात आहे. त्यामूळे कोविड काळात गर्दीत प्रवास करने धोक्याचे असल्याने विरार, कल्याण, पालघर या मार्गावरील प्रवासी नाईलाजास्तव खासगी वाहतुकदारांकडे वळण्याची शक्यता सुद्दा आहे. त्यामूळे प्रवाशांची संख्या बघता फेऱ्या न वाढवल्यास एसटीचा आर्थिक तोटा वाढण्याची शक्यता आहे. 

राज्य सरकार आणि रेल्वे प्रशासन अद्याप सामान्य लोकल प्रवाशांना दिलासा देण्यास असमर्थ ठरले आहे. वाडा, पालघर, विरार, वसई, कल्याण या भागातून सर्वात जास्त कामगार मुंबईत दैनंदिन प्रवास करतात मात्र, लोकलमध्ये प्रवासाला परवानगी तर नाहीच, मात्र पर्यायी सुविधा सुदधा राज्य सरकारने उपलब्ध करून दिल्या नाही. एसटीच्या फेऱ्या सुद्धा अपुऱ्या असल्याने बससाठी सुद्धा रांगा लावाव्या लागत असून, तासंतास वाट पाहावी लागते आहे.
- ऍड.विवेक ठाकरे,
सामाजिक कार्यकर्ते, वाडा

मुंबईच्या बेस्ट उपक्रमात आधीच इतर विभागातील एसटीच्या 1000 बसेसची सेवा सुरू आहे. त्यासोबतच अद्यापही अत्यावश्यक सेवेतील एसटीची सेवा सुरूच असून, मुंबई महानगरात सर्वात जास्त फेऱ्या देण्यात आल्या आहे. त्यामूळे यासंदर्भातील माहिती घेऊन प्रवाशांच्या मागणीनुसार फेऱ्या वाढविण्यात येईल
- शेखर चन्ने,
व्यवस्थापकीय संचालय, एसटी महामंडळ

ST buses insufficient Crowd of passengers at Mumbai Central Bus Depot

-------------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com