"अर्णब गोस्वामी यांनी मुख्यमंत्री ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याबद्दल जे वक्तव्य केलं ते चुकीचंच"

सुमित बागुल
Tuesday, 15 December 2020

"अर्णब गोस्वामी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यंटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याबद्दल जे वक्तव्य केलं चुकीचं "

मुंबई: विधानसभेचे हिवाळी अधिवेशन मुंबईत सुरु आहे. दोन दिवसीय हिवाळी अधिवेशनात आज महाराष्ट्राचे विधानसभेचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विविध मुद्द्यांवरून विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. विविध मुद्द्यांवरून विधानसभेचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्रातील कोरोना परिस्थिती, मुंबईतील नागरिकांसाठीची मुंबई मेट्रो आणि कांजूरमार्गमधील मेट्रो कारशेड, कंगना रनौत आणि अर्णब गोस्वामी या आणि अशा अनेक विषयांवर सरकारवर निशाणा साधलाय. 

महत्त्वाची बातमी  : मला पाडून दाखवा, भर सभागृहात अजित पवारांनी स्वीकारलं मुनगंटीवारांचं चॅलेंज

अर्णब गोस्वामी आणि कंगना रनौत प्रकरणावरून महाराष्ट्राचे विधानसभेचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारला फैलावर घेतलं. विधानसभेत पुरवणी मागण्यांवरील चर्चा सुरु होती, त्या चर्चेमध्ये फडणवीस बोलत होते.

"मी भारतात आल्यावर त्यांना जेलमध्ये टाकलं नाही"

यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणालेत की, "अर्णब गोस्वामी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यंटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याबद्दल जे वक्तव्य केलं आहे ते चुकीचंच आहे. मी त्यांच्या वक्तव्याचा निषेध करतो. अर्णब गोस्वामी यांना तसं बोलण्याचा अधिकार नाही. अर्णब गोस्वामी यांनी माझ्याविरोधातही तीन वेळा मीडिया ट्रायल चालवली होती. मी अमेरिकेत गुंतवणूकदारांशी भेटीगाठी घेत असताना माझ्यामागे कॅमेरे लावले होते. मी गुंतवणुकदारांशी चर्चा करत होतो आणि ह्यांचे कॅमेरे वेगळंच काम करत होते. मात्र मी भारतात आल्यावर त्यांना जेलमध्ये टाकलं नाही."

"इथं कायद्याचं राज्य आहे, ते कायद्यानंच चालवा"

तर, देवेंद्र फडणवीस यांनी अभिनेत्री कंगना रनौत प्रकरणावरूनही विधानसभेमध्ये आवाज उठवला. कंगना रनौत प्रकरणावरूनही देवेंद्र फडणवीस यांनी सरकारला सुनावलं आहे. तुम्ही अब्रूनुकसानीचा दावा ठोकू शकतात. मात्र तुम्ही मनात आलं म्हणून कुणाचं घर तोडू शकत नाही. 'खून करणाऱ्यास फाशी झालीच पाहिजे, चोरी करणाऱ्यास शिक्षा झालीच पाहिजे. मात्र हे काही पाकिस्तान नाही, इथं कायद्याचं राज्य आहे, ते कायद्यानंच चालवा,' असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारला हाणला आहे. तुम्ही सरकार कितीही वर्ष चालावा, २५ वर्षे चालावा किंवा २७ वर्षे चालावा, मात्र ते कायद्याने चालवा", असेही फडणवीस म्हणालेत. 

देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई मेट्रो कारशेड तसेच राज्यातील कोरोना परिस्थितीवर देखील कठोर शब्दात टीका केली आहे. 

leader of opposition devendra fadanavis on  arnab goswmai and kangana ranuat
  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: leader of opposition devendra fadanavis on arnab goswmai and kangana ranuat