esakal | एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा तिढा कायम; दोन महिने प्रतीक्षा; आगामी सणांमुळे आर्थिक विवंचना 
sakal

बोलून बातमी शोधा

एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा तिढा कायम; दोन महिने प्रतीक्षा; आगामी सणांमुळे आर्थिक विवंचना 

एसटी महामंडळाच्या सुमारे एक लाखपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांचे दोन महिन्यांचे वेतन थकले आहे.

एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा तिढा कायम; दोन महिने प्रतीक्षा; आगामी सणांमुळे आर्थिक विवंचना 

sakal_logo
By
प्रशांत कांबळे

मुंबई ः एसटी महामंडळाच्या सुमारे एक लाखपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांचे दोन महिन्यांचे वेतन थकले आहे. यापूर्वी जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या महिन्यांपैकी जुलैचे वेतन नुकतेच राज्य सरकारने दिलेल्या विशेष निधीतून केले; मात्र ऑगस्ट, सप्टेंबरच्या वेतनाचे काय, असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. 

'एमपीएससी'ची राज्य सेवा पूर्व परीक्षा पुन्हा पुढे ढकलली; कोरोना संसर्गामुळे राज्य सरकारचा निर्णय

कोरोनामुळे एसटीच्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे. कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठीसुद्धा एसटीकडे पैसे नसल्याने राज्य सरकारने सवलत मूल्यांच्या प्रतिपूर्तीची आगाऊ 770 कोटींची रक्कम दोन टप्प्यांत दिल्याने आतापर्यंत एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन होऊ शकले आहे; मात्र अद्याप ऑगस्ट, सप्टेंबरचे वेतन प्रलंबित असून, ऑक्‍टोबर महिन्यातील दसरा आणि नोव्हेंबरमधील दिवाळी या सणांवरही संक्रांत ओढवण्याची शक्‍यता असल्याने एसटी कर्मचारी विवंचनेत आहेत. 

राज्य सरकारने एसटी महामंडळाला आर्थिक संकटातून काढण्यासाठी एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावे. त्यामुळे एसटी महामंडळाच्या संपूर्ण समस्या दूर होऊन राज्यातील सर्वसामान्यांना सुरक्षित प्रवासाची सोय होईल. 
- संदीप शिंदे,
अध्यक्ष, राज्य एसटी कामगार संघटना 

एसटी कर्मचाऱ्यांचे पगार अत्यंत कमी आहेत. त्यामुळे मूलभूत गरजा भागविणे अशक्‍य झाल्याने उपासमारीची वेळ आली आहे. दोन महिन्यांचे वेतन देण्यासाठी सरकारने तत्काळ अर्थसाह्य द्यावे; तसेच एसटीने तत्काळ दोन महिन्यांचे थकीत वेतन अदा करावे. 
- मुकेश तिगोटे,
महाराष्ट्र एसटी वर्कर्स कॉंग्रेस (इंटक) 

----------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

loading image