'एमपीएससी'ची राज्य सेवा पूर्व परीक्षा पुन्हा पुढे ढकलली; कोरोना संसर्गामुळे राज्य सरकारचा निर्णय

तुषार सोनवणे
Friday, 9 October 2020

mpscची राज्य सेवा पूर्व परीक्षेला मराठा संघटनांकडून होणारा विरोध पाहता, ती पुढे ढकलण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यता आला आहे.

मुंबई - महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या राज्य सेवा पूर्व परीक्षेला मराठा संघटनांकडून होणारा विरोध पाहता, ती पुढे ढकलण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यता आला आहे.

चित्रपटगृहे सुरू; पण आर्थिक घडी सावरणे कठीण; देशभरात नऊ हजार कोटींचे नुकसान

याआधी कोरोनाचा धोका आणि लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर राज्यसेवा पूर्व परीक्षा परिक्षा पुढे ढकलण्यात आली होती. ती 11 ऑक्टोबर रोजी होणार होती. परंतु दरम्यान मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली. म्हणून काही मराठा संघटनांनी राज्य लोकसेवा आयोगाच्या परिक्षेबाबत आक्षेप घेतला. खासदार संभाजी राजे छत्रपती यांनी .या परीक्षा झाल्यास सरकारला गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशारा दिला होता. तर छावा संघटनेने या परीक्षा होऊ द्याव्यात असा घाट घातला होता. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांनीही या परीक्षा घ्याव्यात असे म्हटले होते. 

मुंबई रेल्वे गाड्यांचे नियोजन करा; मुंबई उच्च न्यायालयाच्या राज्य सरकारला सूचना

राज्य सरकारवर आयोगाच्या परीक्षा न घेण्याबाबत दबाव वाढत असताना, विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण तयार झाले होते. या महत्वपूर्ण विषयावर आज राज्य मंत्रीमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत कोरोनाच्या काळात परीक्षा घेण्याबाबत आयोगाची आणि विद्यार्थ्यांची तयारी किती याबाबतही विचार विनिमय करण्यात आल्याचे समजते. त्यामुळे विद्यार्थ्यांना कोरोना धोका होऊ नये. लॉकडाऊन आणि कोरोनामुळे  विद्यार्थ्यांना पुन्हा अभ्यासाला वेळ मिळावा म्हणून, या बैठकीत राज्य सेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

-------------------------------------------------


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: State service pre-examination of MPSC postponed again