esakal | राज्य शासनाच्या धर्तीवर एसटी कर्मचाऱ्यांना मिळणार असाधारण रजा
sakal

बोलून बातमी शोधा

राज्य शासनाच्या धर्तीवर एसटी कर्मचाऱ्यांना मिळणार असाधारण रजा

एसटी महामंडळावर सुमारे 1 लाखांपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा बोजा वाढत असल्याने, त्यासाठी लवकरच असाधारण रजा योजनेची अंमलबजावणी एसटी महामंडळात सुद्धा केली जाणार आहे. 

राज्य शासनाच्या धर्तीवर एसटी कर्मचाऱ्यांना मिळणार असाधारण रजा

sakal_logo
By
प्रशांत कांबळे

मुंबई:  कोरोना काळात कर्मचाऱ्यांच्या वेतनावरील खर्चात घट करण्यासाठी राज्य शासनाने कर्मचाऱ्यांना असाधारण रजा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याआधारावरच आता एसटी महामंडळावर सुमारे 1 लाखांपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा बोजा वाढत असल्याने, त्यासाठी लवकरच असाधारण रजा योजनेची अंमलबजावणी एसटी महामंडळात सुद्धा केली जाणार आहे. 

एसटी महामंडळाचे कोरोना काळापूर्वीचे 16 हजार फेऱ्या आणि  दैनंदिन 22 लाखांचे प्रवासी उत्पन्नात घट होऊन, सध्या फक्त सहा हजार 900 फेऱ्या आणि पाच कोटीचे उत्पन्न एसटीला मिळत आहे. त्यामध्ये कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठीच दैनंदिन नऊ कोटी रूपयांचा खर्च येत असून, डिझेलसाठी सुमारे तीन कोटी रूपयांचा दैनंदिन खर्च लागतो आहे. अशा परिस्थितीत एसटी महामंळाचा सध्या उत्पन्नापेक्षा खर्च जास्त अशी परिस्थिती आहे.

अधिक वाचाः  राजकारणात विरोधकांचे चारित्र्यहनन, संजय राऊतांचा अमित शहांवर निशाणा

त्यामुळे भविष्यात एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनावरील खर्चात घट करण्यासाठी एसटी महामंडळाकडून कर्मचाऱ्यांना असाधारण रजेच्या योजनेची अमंलबजावणी करण्याच्या विचाराधीन आहे. यासंबंधीत सध्या एसटी महामंडळाच्या संचालकांची चर्चा झाली असून, महामंडळाच्या संचालक मंडळाच्या मान्यतेनंतर त्याची अंमलबजावणी केली जाणार असल्याचे एसटी महामंडळाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नाव न लिहीन्याच्या अटीवर सकाळ शी बोलताना सांगितले आहे.

अधिक वाचाः  ठाणे खड्डेमुक्त न करा, नाहीतर क्का जाम आंदोलन करु, भाजपचा इशारा

------------------------

(संपादनः पूजा विचारे)

ST employees will get extraordinary leave on the lines of state government