मोठी बातमी : रेल्वेनंतर एसटी खासगीकरणाच्या वाटेवर; काय घडतंय नक्की, वाचा

मोठी बातमी : रेल्वेनंतर एसटी खासगीकरणाच्या वाटेवर; काय घडतंय नक्की, वाचा


मुंबई ः रेल्वेने 109 मार्गावर 151 खासगी रेल्वे चालविण्यासाठी नुकतेच कंपन्यांना प्रस्ताव मागितले आहे. त्यानंतर आता, सर्वसामान्य जनतेचे लालपरी एसटी सुद्धा खासगीकरणाच्या वाट्यावर असल्याचे दिसून येत आहे. लाॅकडाऊन काळात एसटीचे निव्वळ प्रवासी उत्पन्न बुडल्याने, कर्मचाऱ्यांचे वेतन देणे ही कठीण झाले असतांना, याचा फायदा घेत राज्यातील खासगी बस वाहतूकदारांनी एसटीचे उत्पन्न आणि प्रवासी नसलेल्या मार्गांवर खासगी बस वाहतूकदारांना संधी देण्याची मागणी राज्य शासनाकडे केली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभुमीवर राज्यात एसटीची प्रवासी सेवा ठप्प झाली आहे. मुंबई उपनगरातील अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांच्या प्रवासी सेवेशशिवाय राज्यातील एसटीचे चाक थांबले आहे. अशा परिस्थितीत महामंडळाला दैनंदिन कोट्यावधी  रूपयाचा तोटा सहन करावा लागत आहे. एसटीच्या अनेक मार्गांवर खासगी प्रवासी वाहतूकीने आधीज जम बसवला आहे त्यामुळे प्रवासी मिऴत नसल्याने, अनेक मार्ग सुद्दा बंद केले आहे. 

लाॅकडाऊन काळात सार्वजनिक आणि खासगी प्रवासी वाहतूक मोठ्या प्रमाणात अडचणीत असतांना, राज्यातील खासगी वाहतूकदारांनी राज्य शासनाकडे एसटीच्या मार्गांवर खासगी बस चालवण्याची मागणी केली आहे. महामंडळाचे उत्पन्न आणि प्रवासी मिळत नसलेल्या मार्गांवर खासगी बस वाहतूकदारांना दिल्यास, त्यामधून उत्पन्न काढता मिळणार आहे. तर त्याचा फायदा एसटी महामंडळा सुद्धा कसा करून देता येईल यासंदर्भातील उपाय खासगी बस वाहतूकदारांनी राज्य शासनाला निवेदणातून दिल्या आहे.

कर्नाटक वरून महाराष्ट्रात 500 बसेस येतात. मात्र महाराष्ट्राच्या 20 ही बसेस कर्नाटकात जात नाही. छत्तीसगड मधील रायपूर ते नागपूर, मध्यप्रदेश मधील इंदोर वरून महाराष्ट्रात गाड्या येतात मात्र, एसटी महामंडळ इंदोरसाठी आपल्या गाड्या सोडत नाही. अशा वेळी खासगी बस वाहतूकदारांना ही संधी द्यावी म्हणजे आम्हालाही व्यवसाय मिळेल आणि एसटी महामंडळाचा सुद्धा यामध्ये फायदा होईल.
- हर्ष कोटक, सरचिटणीस, मुंबई बस मालक संघंटना 

 

एसटी महामंडळ राज्यातील जनतेला विविध सवलतीसह प्रवाशी वाहतूक किफायतशीर दरात व सुरक्षित सेवा देते त्या तुलनेने खाजगी वाहतूकदार जनतेला मनमानीपणे लुटतात तसेच सुरक्षिततेची हमी नाही त्यामुळे सरकारने एसटीला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याची गरज असून सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मजबूत करावी, भविष्यातील खाजगीकरणाच्या प्रस्तावास तीव्र विरोध आहे.
- मुकेश तिगोटे, सरचिटणीस, महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस (इंटक)

राज्य परिवहन विभागाची टास्क फोर्स समितीला त्यांची उपसमिती खासगी बस वाहतूकदारांच्या एकूण समस्या आणि त्यांच्या मागण्याचा अहवाल सादर करतील, हा अहवाल राज्य शासनाकडे जाईल, त्यानंतर या सर्व मागण्या आणि समस्यांवर विचार केला जाणार आहे. सध्या एसटीचे मार्ग खासगी बस वाहतूदरांना देण्याचा कोणताही निर्णय नाही.
- शेखर चन्ने, आयुक्त, राज्य परिवहन विभाग 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com