ST Strike : शरद पवारांच्या घरावरील हल्लाप्रकरणानंतर डीसीपींची उचलबांगडी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

st strike

ST Strike : शरद पवारांच्या घरावरील हल्लाप्रकरणानंतर डीसीपींची उचलबांगडी

मुंबई : मुंबई पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक अहवालात शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानाबाहेर झालेल्या हल्ल्यात गुप्तचर यंत्रणा कुचकामी असल्याची पुष्टी झाली आहे. हा हल्ला म्हणजे मुंबई पोलिसांचे अपयश असल्याची टीका मोठ्या प्रमाणात झाली होती. त्या पार्श्वभूमीवर परिमंडळ दोन पोलीस उपायुक्त योगेश कुमार यांना पदावरून हटवण्यात आले आहे. कर्तव्य पूर्ण करण्यात अपयशी ठरल्याबद्दल कुमार यांच्यावर कारवाई झाली आहे. कायदा व सुव्यवस्था सहआयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी कारवाई केली आहे. (Mumbai DCP Yogesh Kumar Removes From DSP (Zone -2) Post)

उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात पोलिस यंत्रणा अपयशी ठरल्याचा स्पष्ट आरोप केला होता. दरम्यान, डीसीपी डिटेक्शन निलोत्पल यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे.

हेही वाचा: 'पोलिस यंत्रणेचा गैरवापर होतोय'; सदावर्तेंच्या पत्नीचे पुन्हा गंभीर आरोप

सदावर्तेंना दोन दिवसांची पोलीस कोठडी

एसटी कर्मचाऱ्यांनी आक्रमक होत शुक्रवारी (दि.8) थेट शरद पवार यांच्या मुंबईतील निवासस्थानी हल्ला चढवला होता. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर झालेल्या हल्ल्या प्रकऱणी अॅड गुणरत्न सदावर्ते यांना किल्ला कोर्टाने दोन दिवासांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तर, इतर 109 आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

हेही वाचा: मोठी बातमी : भारतीय हवामान खात्याचे ट्विटर अकाउंट हॅक

काल, शुक्रवारी रात्री सदावर्तेंना अटक केल्यानंतर आज त्यांना किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते. आंदोलनकर्त्यांना वकील गुणरत्न सदावर्ते यांनी भडकावल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. महेश वासनीस यांनी सदावर्तेंची बाजू मांडली. (ST Worker Strike) ही कारवाई रोषातून सुरू असल्याचं सदावर्तेंच्या वकिलांनी म्हटले आहे. राज्य सरकारच्यावतीेने 14 दिवासांच्या पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली होती. मात्र, दोन्ही बाजुंचा युक्तीवाद ऐकून झाल्यानंतर न्यायालयाने सदावर्तेंना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तर, इतर 109 आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. (Killa Court sent Gunratna Sadavarte In Police Custody)

Web Title: St Strike Mubai Dcp Yogeshkumar Picksup From Post Of Dsp After Protest On Sharad Pawars House In Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top