ncp sharad pawar modi bagh house is under police protection pune
ncp sharad pawar modi bagh house is under police protection punesakal

एसटी कर्मचाऱ्यांचा विषय चिघळला, आणखी एका अधिकाऱ्याची उचलबांगडी

Published on

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या मुंबईतील 'सिल्व्हर ओक' बंगल्याबाहेर एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन केल्याचे पाहायला मिळाले होते. याची राज्य गृहमंत्रालयाने दखल घेतली असून यासंपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.

तपासादरम्यान काही वेगवान हालचाली घडत असताना आता गामदेवी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजभर यांनाही हटवण्यात आले आहे. याआधी या घटनेनंतर पोलीस उपायुक्त योगेशकुमार गुप्ता यांची बदली करण्यात आली होती.

ncp sharad pawar modi bagh house is under police protection pune
शरद पवार हाय हाय... एसटी कर्मचाऱ्यांची 'सिल्व्हर ओक'वर चप्पलफेक

शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक या निवासस्थानी चप्पल आणि दगडफेक करण्यात आली. संपाच्या परिस्थितीला शरद पवार जबाबदार असल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला होता. मात्र, पवारांच्या घरावर हल्ला झाल्यानंतर राज्यात राजकीय घटनांनी वेग घेतला आहे. पवारांच्या घरावरील हल्ला पूर्वनियोजित असल्याचं म्हटलं जातंय.

या मोर्चाची माहिती मीडियाला मिळाली मात्र पोलिसांना याची खबर का नव्हती, असा प्रश्न अजित पवारांनी उपस्थित केला. पोलिसांची भूमिका संशयित असल्याचं आरोप होत आहे. आज सहआयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेतली. या दरम्यान संबंधित कारवाई झाली आहे. (ST Worker strike)

एसटीच्या निलीनीकरणावर अद्याप कर्मचारी ठाम आहेत. कोर्टाचा निर्णय अन्यायकारी असल्याचं त्यांनी म्हटलं. शरद पवार यांनी कोणत्याही बैठका घडवून आणलेल्या नाहीत. पवार हे विलीनीकरण न होण्यामागचे सूत्रधार असल्याचं काही कर्मचाऱ्यांनी म्हटलंय. महाविकास आघाडी सरकारने १२४ एसटी कर्मचाऱ्यांचा खून केल्याची संतप्त भूमिका आंदोलनकर्त्या एसटी कर्मचाऱ्यांनी मांडली. (ST workers attack on sharad pawars' house)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com