ST Strike : कायदा हातात घेतल्यानंतर कुणाचीही सुटका नाही : परब | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Anil Parab

ST Strike : कायदा हातात घेतल्यानंतर कुणाचीही सुटका नाही : परब

मुंबई : शरद पवार यांच्या मुंबईतील घरावर हल्लाबोल करण्यासाठी एसटीच्या कर्मचाऱ्यांना भडकवल्याप्रकरणी अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना किल्ला कोर्टाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तर, इतर 109 जणांना न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. दरम्यान, यानंतर परिवहन मंत्री अनिल परब यांनी निकालानंतर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, कायदा हातात घेणाऱ्या कुणाचीची सुटका नसल्याचे म्हटले आहे. (Anil Parab Reaction On Sadavarte Police Custody )

हेही वाचा: मोठी बातमी! सदावर्तेंना दोन दिवसांची पोलीस कोठडी

परब म्हणाले की, न्यायालयाने निकाल दिला असून, कायदा हातात घेतल्यानंतर काय होते हे न्यायलयाच्या निर्णयानंतर दिसून आले आहे. तसेच कायदा हातात घेतल्यानंतर कुणाचीही सुटका नाही हे प्रत्येकाने लक्षात घ्यावे असे त्यांनी सांगितले. गेल्या पाच महिन्यांपासून ज्या मुद्द्यासाठी एसटी बंद आहे त्यातील एकाही मुद्द्यावर सदावर्ते यांना एकही समाधनकारक उत्तर सापडलेले नस्ल्याचे परब म्हणाले.

विलीनीकरण अमान्या झाले. त्याच बरोबर सातवा वेतन आयोग अमान्य झाला. न्यायालयाने केवळ कर्मचाऱ्यांची बडतर्फी मागे घेण्याचे आदेश दिले आहेत. ते आम्ही यापूर्वीच सातवेळा दिले होते असे परव यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले. एसटीची सेवा पूर्ववत करण्याबाबत शरद पवार यांच्याशी चर्चा केल्याचेही परिवहन मंत्री अनिल परब यांनी सांगितले.

न्यायालयात नेमकं काय घडलं

किल्ला कोर्टातील सुनावणीदरम्यान सरकारीपक्षाच्यावतीने सरकारी वकील प्रदीप घरत यांनी युक्तिवाद केला. तसेच आरोपींवर लावण्यात आलेली कलमं गंभीर असून, त्यांना कोठडी द्यावी, अशी मागणी केली. त्यानंतर कोर्टाने सदावर्ते यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली तर, इतर 109 जणांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. यावेळी सरकारीन पक्षाच्या वकिलांनी अटक करण्यात आलेले आरोपी तपासात सहकार्य करत नाहीत असे सरकारी वकिलांनी न्यायालयात सांगितले. काल पवार यांच्या घरावर हल्ला करण्यासाठी गेलेल्यांमध्ये खरोखरच एसटी कर्मचारी होते की काही भाडोत्री लोक यात घुसविण्यात आले होते, याचा तपास करण्यासाठी १४ दिवसांची कोठडी मिळण्याची मागणी त्यांनी केली.

Web Title: St Strike Sharad Pawar Home Anil Parab Reaction After Court Decision

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top