गणेशोत्सवापूर्वी आमचे पगाराचे पूर्ण पैसे द्या, एसटी कर्मचारी संघंटनेची मागणी...

प्रशांत कांबळे
गुरुवार, 30 जुलै 2020

एसटी कामगारांना कोरोनाच्या पार्श्वभुमीवर लाॅकडाऊन केल्यानंतर टप्या टप्यात वेतन देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला होता.

मुंबई : गौरी गणपतीच्या सणाच्या पार्श्वभुमीवर एसटी कामगारांना महामंडळाने उर्वरित महिन्यांचे शिल्लक वेतन द्यावे, मार्च महिन्यात 25 टक्के, मे महिन्याचे 50 टक्के तर जून महिन्याचे 100 टक्के वेतन अद्याप एसटी कामगारांचे शिल्लक आहे. त्यामूळे एसटी कर्मचारी अडचणीत सापडला असल्याने हे वेतन एकत्रीत देण्याची मागणी राज्य एसटी कामगार संघंटनेचे अध्यक्ष संदिप शिंदे यांनी केली आहे. 

एसटी कामगारांना कोरोनाच्या पार्श्वभुमीवर लाॅकडाऊन केल्यानंतर टप्या-टप्यात वेतन देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला होता. त्यामुळे गेल्या तिन महिन्यातील उर्वरित वेतन अद्याप महामंडळाकडे शिल्लक आहे. त्यामध्येच आता जुलै महिन्याचे वेतन अदा केल्यानंतर गेल्या महिन्यातील उर्वरीत वेतन सुद्धा अदा करावे अशी मागणी करण्यात येत आहे.  

मोठी बातमी दरवर्षी गिरगाव चौपाटीवर बाप्पाचं विसर्जन करतात? आधी विसर्जनाचा टाइमस्लॉट बुक करा, नाहीतर ऐनवेळी गोंधळ...

सार्वजनिक उपक्रम, महामंडळे आणि स्थानिक स्वराज्य संस्था यांना देखील मार्च महिन्याचे उर्वरीत 25 टक्के वेतन प्रदान करण्याबाबत कार्यवाही करण्याचे आदेश राज्य शासनाने दिले आहेत. शासनाने त्यांच्या कर्मचाऱ्यांना एप्रिल, मे, जून चे पूर्ण वेतन अदा केलेले आहे. त्याचप्रमाणे जुलैचे पूर्ण वेतन अदा करण्याबाबतही राज्य शासन परिपत्रक काढले आहे. परंतु एसटी महामंडळाने त्यांच्या कामरांना गेल्या तीन महिन्यातील उर्वरीत वेतन दिले नसल्याने एसटी कामगारांवर आर्थिक संकट ओढावले असल्याने एसटी कामगारांचे गेल्या तिन महिन्यातील उर्वरित वेतन आणि जुलै महिन्याचे पुर्ण वेतन देण्याची मागणी राज्य एसटी कामगार संघंटनेने केली आहे.

( संपादन - सुमित बागुल )

ST workers association demands government to pay their salaries with arrears   


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ST workers association demands government to pay their salaries with arrears