सेवा समाप्तीची ऑर्डर दिल्याने परळ डेपोत ST कर्मचाऱ्यांचं कामबंद आंदोलन

सुमित बागुल
Friday, 25 September 2020

मुंबईतील परळ डेपोमधून महत्तवाची येतेय. परळ डेपोमधील एसटी कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केलंय.

मुंबई : मुंबईतील परळ डेपोमधून महत्तवाची येतेय. परळ डेपोमधील एसटी कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केलंय. यामध्ये चालक आणि वाहक दोघांचा समावेश आहे. परळ मधील काही कर्मचाऱ्यांना ST सेवा समाप्तीची ऑर्डर दिल्याने हे काम बंद आंदोलन. गेल्या काही महिन्यांपासून ठाणे, पालघर आणि मुंबई डेपोमधील कर्मचाऱ्यांचे पगार झालेले नाहीत. अशात एकीकडे पगार न देता हे तीनही डेपो मिळून जवळपास ८४ कर्मचाऱ्यांना सेवा समाप्त करण्यात आलेली असल्याची माहिती आहे.

महत्त्वाची बातमी : भिवंडी इमारत दुर्घटनेत २० चिमुरड्यांचा निप्षाप बळी

मुंबई, ठाणे आणि पालघर या डेपोत अत्यावश्यक सेवेत मोडणाऱ्या चालक आणि वाहकांना प्रत्यक्षात काम करूनही अद्याप पगार दिलेला नाही. तीन महिन्यांचा पगार जो इतर विभागातील कर्मचाऱ्यांना देण्यात आला तोही इथल्या कर्मचाऱ्यांना मिळालं नसल्याचं इथे उपस्थित कर्मचाऱ्यांनी सांगितलं. काहींचा एप्रिलपासून पगार झालेला नाही. ST च्या कारवाईच्या प्रोसेस प्रमाणे १८४ लोकांना परळ आगारात चार्जशीट देण्यात आलेलं. त्या चार्जशीटचा जोवर निकाल लागत नाही तोवर त्यांना पगार देण्यात येत नाहीत, असं इथे उपस्थित एका कर्मचाऱ्याने सांगितलं 

महत्त्वाची बातमी  : कारवाईसाठी व्हॉट्सअॅप चॅट हा सक्षम पुरावा असू शकत नाही, उज्ज्वल निकम यांची माहिती

तर आणखी एका कर्मचाऱ्याशी याबाबत बातचीत केलं असता ते म्हणालेत, ४८ तासात मला कामावर हजर व्हायला सांगितलं होतं त्यानंतर मी २४ तासातच कामावर हजर झालो होतो. सोमवारी अर्ज करून मला हजरही करून घेण्यात आलं. मात्र मी गाडी घेऊन निघालो तर मला थांबण्यात आलं आणि सांगितलं गेलं, की तुमची सेवा समाप्त करण्यात आली आहे. 

दरम्यान आता या पार्श्वभूमीवर मुंबईतील परळ डेपोमध्ये कामबंद आंदोलन सुरु करण्यात आलंय. यामध्ये परळ डेपोतील तब्बल शंभर कर्मचारी सहभागी झालेत. 

st workers in parel depot start no work agitation because many workers got stop work notice


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: st workers in parel depot start no work agitation because many workers got stop work notice